तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

गेवराईच्या गुरुकुल शाळेत साठे जयंती व टिळक यांची पुण्यतिथी


सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 5 __ शहरातील गुरूकुल इंग्लिश स्कुल मध्ये आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
     या कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी म्हणुन नानासाहेब परजणे व इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष प्रा. मोहन भागवतराव ठाकर हे उपस्थीत होते. या कार्यक्रमा निमित्त मुलांनी लोकमांन्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन शैली व फकीरा कादंबरी विषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रेम वाघमारे, प्रतिक कुटे, पौळ हरिओम, काकडे विश्वाजित, अंजली नरोका, शिंदे नकुल, घाडगे संस्कार, माने शिवम, नकुल जवंजाळ, ठाकर गुंजन, पौळ प्रेम व ईतर मुलांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका  बरगे वंदना, गिरे सुरेखा, दाभाडे उषा, मडकर पुजा व जैन मावशी तसेच शिक्षकांनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment