Breaking News
Loading...

Friday, 4 August 2017

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृती कपातीचा निर्णय रद्द करावा - अशोक गुंजाळ


सुभाष मुळे...
-------------------
गेवराई, दि. 4 __ केंद्र सरकारने ओ. बी. सी. (OBC) विध्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कपात करण्या संदर्भात दिलेला निर्णय तात्काळ रद्द करणे बाबतचे निवेदन आ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेवराई येथील नायब तहसीलदारांना दिले.
     केंद्र सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या ओ. बी. सी. (OBC) च्या शिष्यवृत्तीत अचानक कपात करण्यात आली व इतर मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यांचे मेडिकलसाठी प्रवेशाचे आरक्षणही कमी करण्यात आले. ओ. बी. सी. विद्यार्थ्यांकरीता केंद्र सरकार मार्फत ५५९ कोटी रुपये शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येत होती, परंतु ५५९ कोटी वरून त्याचे ५४ कोटी रुपये करण्यात आली. २७ % आरक्षणावरून २ % मेडिकल प्रवेशाकरिता करण्यात आलेले आहे. या निर्णयाने बहुसंख्य असलेल्या ओबीसी ( OBC ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे. हे दोन्ही अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता प्रशासकीय स्तरावर आपण पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
      निवेदन देण्यासाठी आ.भा.महात्मा फुले समता परिषद गेवराई तालुकाउपाध्यक्ष अशोक गुंजाळ, बाबासाहेब घोडके, गणेश काळे, रामेश्वर गुंजाळ, किरण गुंजाळ आदींसह समता सैनिक उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment