तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

मराठा क्रांती मोर्चा साठी पाथरीत जन जागृती रॅली

पाथरी/कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण आणि इतर मागण्या संदर्भाने मुंबई येथे मराठा समाज बांधवांनी कोटीच्या संखेत उपस्थित राहावे या साठी आज पाथरी शहरात सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने जनजागृती करण्या साठी अतिषय शिस्त बद्ध मोटार सायकल रॅली काढली या वेळी "जय जिजाऊ" "जय शिवराय" च्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
'अभी नही तो कभी नही' अशी आर्त हाक देत सकल मराठा समाज ९ आॅगष्ट रोजी मुंबई येथे करोडोंच्या संखेत एकवटावा या साठी राज्यभरात तयारी सुरू असून जिल्ह्याच्या ठिकाणी निघालेल्या लाखोंच्या मोर्चा नंतर हा मोर्चा एैतिहासिक ठरणार असल्याने भावी पिढीचे भवितव्य ठरवण्या साठी चा हा मोर्चा असनार आहे. या मोर्चा साठी गावगाड्यातील प्रत्यक मराठा बंधू भगिनीनीं उपस्थिती लावावी या साठी आज पाथरी शहरातील नखाते पेट्रोल पंपा पासून सकल मराठा समाज बांधवांनी अतिषय शिस्तिचे प्रदर्शन करत शहरातून शासकिय विश्रामगृह शिक्षक कॉलनी, राष्ट्रवादी भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे पोखर्णी फाटा परत राष्ट्रीय महामार्गाने नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ठिकाणी पुष्पहार अर्पन करून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात रॅली विसर्जन करण्यात आले. या वेळी मराठा समन्वय समिती पदाधिकारी यांनी मुंबई क्रांती मुक मोर्चा संतर्भाने उपस्थितांना पाथरी तालुक्याच्या नियोजना संदर्भात सुचना केल्या. सकाळी अकरा वाजता शहरातून निघालेल्या मोटार सायकल स्वारांनी जय जिजाऊ जय शिवराय चा जय घोष करत मुंबई मोर्चा साठी येण्याचे आवाहन केले यात शेकडो मोटार सायकल स्वार सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment