तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

मोहरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्‍यांच्या खोट्या कामांची चौकशी करन्याची मागणी


फुलचंद भगत
मंगरुळपीर- प्राथमिक आरोग्य केंद्र,मोहरी येथील अनिल सुर्वे यांनी खोटे काम आणी वैयक्तीक काम न केल्याने येथील डाॅ.थोरात यांनी काही कर्मचार्‍यांना हाताशी धरुन,खोटेनाटे आरोप लावून निलंबित करन्याचा प्रस्ताव पाठविन्यात आला.असेच अनेक खोटे कामे केल्याने डाॅ.थोरात यांच्या खोट्या कामांची चौकशी करुन योग्य कारवाई करन्याच्या मागणीसाठी सुरेखा सुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना लेखी निवेदन दि.१आॅगस्ट रोजी सादर केले आहे.
       सविस्तर वृत्त असे की निवेदनकर्त्या सुरेखा सुर्वे यांचे पती अनिल सुर्वे हे प्रा.आ.केंद्र मोहरी येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते.कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने गैरहजर असल्याचा ठपका ठेवून निलंबीत करन्याचा प्रस्ताव पाठविन्यात आला आणी निलंबितही करन्यात आले.यासाठी विचारणा करन्यासाठी माझे पती डाॅ.थोरात यांचेकडे गेले असता अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे माझ्या पतिची माणसिक स्थिती पुर्ण बिघडलेली असल्याचा आरोप निवेदनाव्दारे सुरेखा सुर्वे यांनी केला आहे.याचबरोबर मुख्यालयी न राहत असल्याचा आरोप निलंबन प्रस्तावात केला होता परंतु इतरही मुख्यालयी राहत नाही त्यामुळे एकालाच नियम आणी दुसर्‍यांना सुट का?असा प्रश्नही यानिमित्ताने ऊपस्थीत केला अाहे.सुर्वे यांना निलंबन भत्ताही ७५%ची मागणी असुनही५०%च देन्यात आला आहे.तसेच २०१५-१६ मध्ये प्रा.आ.केद्र मोहरी येथील आरोग्य सेविका श्रिमती व्हि.एस.पाटिल यांचाही निलंबनाचा प्रस्ताव वाशिम येथील मूख्य कार्यकारी अधिकाली यांचेकडे पाठविन्यात आला होता परंतु त्याविषयी कार्यवाही गुलदस्त्यातच आहे म्हणून याविषयी माहीती अधिकार कायद्यान्वये माहीती विचारली असता खोटे आश्वासन देवुन माहीती अधिकाराची कार्यवाही रोखन्यात आली.याचबरोबर डाॅ.थोरात यांनी कंञाटी एन एन एम असलेल्या कर्मचार्‍यांशी संगनमत करुन जिएनएम चा साडेतिन वर्षाचा कोर्स पुर्ण केला परंतु कंञाटी एएनएम चा पुर्ण पगार काढलेला आहे.पुर्वपरवानगी न घेतल्याने याविषयी चौकशी करन्याची मागणी असुन प्रा.आ.केंद्र मोहरी येथील आरोग्य सहाय्यक शेख अल्ताफ शेख जमाल यांचेकडे कनिष्ठ सहाय्यकांचा पदभार असतांना त्यांनी डाॅ.थोरात यांच्या संगनमताने त्यांच्या मुळ सेवापुस्कीकेमध्येही बराच घोळ केलेला आहे त्यामुळे मुळ सेवापुस्तिची माहीती घेवून तपासणी करन्यात यावी व त्या सेवापुस्तिकेमध्य डाॅ.थोरात यांनी केलेल्या सहिविषयी स्वाक्षरी विषयी चौकशी करु कार्यवाही करावी.डाॅ.थोरात यांनी याआधी पार्डी टकमोर,मांगुळ झनक,जऊळका आणी मोहरी येथे कर्तव्यावर असतांना केलेल्या कामांची चौकशी करुन सत्य ऊजेडात आणावे कारण याआधीही अनेक तक्रारी आणी आरोप डाॅ.थोरात यांचेवर असल्यानेच ताबडतोब बदल्या करन्यात आल्या आहेत.डाॅ.थोरात यांना पाठीशी घालन्याकरीता कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारीही आहेत त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य कार्यवाही करन्याच्या मागणीचे निवेदन सुरेखा सुर्वे यांनी वरिष्ठांना दिले आहे.

फुलचंद भगत
9763007835

No comments:

Post a Comment