तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

श्रावणमासात सेनगाव शहरातील मांसविक्री बंद करण्याची मागणी

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगाव:- हिंदुधर्मीयांचा पवित्र महिना श्रावणमास चालु हाेऊन ८ दिवस उलटुन ही सेनगाव शहरातील मांसविक्री उघड्यावरच चालु असल्याने यामुळे हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावत असल्याने हि मांसविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी जय श्रीराम मित्र मंडळ सेनगांवच्या वतीने सेनगाव पाेलीस स्टेशन व नगरपंचायत सेनगाव ला दि.३१ जुलै साेमवार राेजी निवेदन देऊन करण्यात आले आहे.
हिंदुधर्मीयांचा पवित्र महिना म्हणजे श्रावणमास महिना असुन या महिन्यात हिंदुधर्मीयांचे विविध सण असतात. याकाळात मांसविक्री बंद करण्याची गरज असतांनीचा मात्र उघड्यावरच मांसविक्री चालु आहे. यामुळे हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावत असल्याने सेनगाव शहरातील जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने हि मांसविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी सेनगाव पाेलीस स्टेशन व नगरपंचायत सेनगाव ला निवेदन देऊन करण्यात आली आहे. मांसविक्री तात्काळ बंद न झाल्यास तिव्र आदाेंलन छेडण्याचा ईशारा ही दिला असल्याचे समजते. या निवेदनावर युवासेना सेनगाव उप शहरप्रमुख अनिल गित्ते-पाटील, असलम शहा, विकास लाेहटे,डिगांबर देशमुख, गणेश रंजवे, भैया बिडकर, अमर देशमुख,प्रशांत देशमुख, गाेपाल टाकरस, रामा वाघमाेडे, जीवन हाेडबे, गजानन कासार आदीच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment