तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

माहूर तहसीलदरांनी आवळल्या रेती माफियांच्या मुसक्या

           माहूर (प्रतिनिधी)   माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी काठच्या लांजी,नेर,लिंबायत,टाकळी इ.ठिकाणच्या पेंडातील अवैध रेती साठा जप्त करण्या विषयी झालेल्या तक्रारीची दखल घेवून  जिल्हया वरून करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर यांचे नेतृत्वात आलेल्या पथकाने प्रत्यक्ष रेती साठ्याची पाहणी केली असली तरी  जिल्हा करमणूक अधिकाऱ्यांच्या चमूने  पकडलेल्या अवैध रेती साठ्यावर कुठलीच कार्यवाही प्रस्तावित केली नसल्याने तक्रारी बाबतचा मूळ हेतु मात्र जगजाहीर झालाच नाही.
            वरील वाळू साठ्या संदर्भात लांजी,टाकळी,नेर,मदनापूर,मालवाडा इत्यादि ठिकाणच्या सुमारे ५००  ब्रास रेतीचा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी पूर्वीच आपल्या कार्यालयाचे मंडळ अधिकारी जि.जि. येरावार, तलाठी  बि.जे. कांबळे यांनी टाकळी,मुरली, लिंबायत,या सज्जामध्ये ३०१ ब्रास व लांजी, मदनापूर, मालवाडा ,नेर व इतर सज्जांमध्ये  अंदाजे  २०० ब्रास रेती साठ्यांचा पंचनामा   केला  असून पुढील कार्यवाहीस्तव प्रस्तावित केला  असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना  सांगितले.
               माहूर तालुक्यात रेती तस्करांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ वर्षभर चालत असून पावसाळयापूर्वी अत्र, तत्र सर्वत्र अवैध रेती साठे मोठ्या प्रमाणात करून ठेवत असल्याचे वास्तव माहूर च्या तहसील कार्यालयापासून मजल दरमजल करत  थेट  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा पर्यंत पोहचल्या असल्या तरी त्यावेळी गावकऱ्यांच्या तक्रारीच नाहीत असे स्थानिक प्रशासनाने सांगितले असता त्यावेळी तेथे हजर असणाऱ्या काही पत्रकारांनी वरील तक्रारींची आठवण करून दिल्यानेच तहसीलदारा मधील शेर जागा झाला आणि प्रस्तुतची धडक कारवाई सुरु केली
                सदरच्या रेती घाटातून रेतीचा अवैध उपसा होत असल्याची तहसीलदार यांना माहिती मिळताच  तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी रात्री १० वाजता जीवाची पर्वा न करता दुचाकींवर स्वार होऊन २ अवैध रेतीसाठयाची रेतीवाहतूक करणाराऱ्या ट्रॅक्टरधारकावर धडाकेबाज कार्यवाही केली , आजतागायत तहसीलदारांनी केलेल्या कार्यवाहीत ५ ट्रॅक्टर जप्त केले असून आता या वाहनधारकांवर महसूल प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment