Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

करम येथील कर्मेश्वर मंदिराला विविध मान्यवरांच्या भेठी


सोनपेठ / प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजे करम येथील कर्मेश्वर मंदिराला श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य साधुन विविध मान्यवरांनी भेठ दिली आहे.
यामध्ये परभणीच्या महापौर मिनाताई वरपुडकर, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, प्रा.मुंजाभाऊ धोंडगे,अॅड.आशोक यादव,श्रीकांत मोरे,संतोष सावंत,अंगद रेवले,अॅड.राजेभाऊ वडकीले,पंडित सावंत,भगवान राठोड यांच्यासह तालुक्यातील राजकीय क्षेञासह ईतर क्षेञातील मान्यवरांनी भेठ दिली.यावेळी मंदिर समीतीचे अध्यक्ष रामकिशन तिवार यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
या श्रावण महिन्यातील दुस-या सोमवार चे यजमान दापत्य सौ.मिरा नारायण बदाले हे होते.
कार्यक्रमाचे सुञचंलन येथील उपसरपंच भुजंगराव हुंबे पाटील यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

1 comment: