तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

  माहुरात  दि.५ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा तर्फे मोटरसायकल रॅली व नियोजन बैठक !  

                

 माहूर(प्रतिनिधी) ९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबई येथे होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाबाबत जनजागृती साठी  तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तालुका माहूर तर्फे  दि.५ रोजी माहूर शहरात भव्य मोटरसायकल रॅली  व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  हि मोटरसायकल रॅली दुपारी १२ :०० वाजता शहरातील रेणुका महाविद्यालय पासून सुरुवात होऊन तालुका खरेदी विक्री संघ कार्यालया पर्यंत निघून  टी पॉइंट माहूर येथे समारोप होणार आहे व त्यानंतर कपिलेश्वर धर्मशाळा माहूर येथे  ९ ऑगस्ट च्या मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी नियोजन बैठक संपन्न होणार असून तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी या रॅली व बैठकीत सहभागी व्हावे आसे आवाहन माहूर तालुका सकल मराठा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलें आहे.

No comments:

Post a Comment