तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दुर करा - अमरसिंह पंडित

सुभाष मुळे..
----------
गेवराई, दि. १ __ मराठवाड्यात केवळ चारच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु आहेत, सध्या औरंगाबाद व लातूर येथे प्रत्येकी १५० तर अंबाजोगाई आणि नांदेड येथे प्रत्येकी १०० अशा एकुण एम.बी.बी.एस. साठी ५०० जागा उपलब्ध आहेत. पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या जागा कमी असल्यामुळे मराठवाड्यातील हुशार, होतकरु आणि वैद्यकीय शिक्षणाकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. वैद्यकीय शिक्षणातील प्रादेशिक असमतोलामुळे अनेक विद्यार्थी १० वी नंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दुर करण्यासाठी एम.बी.बी.एस.च्या जागांमध्ये वाढ करावी आणि बीड येथे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी केली, त्यासाठी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली.
            मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्तेचा दर्जा वाढत आहे, मात्र साधन सुविधेअभावी मराठवाड्यातील विद्यार्थी इयत्ता १० वी नंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणुन धडपड करत आहेत. मराठवाड्या लगतची अनेक कनिष्ठ महाविद्यालये अशा विद्यार्थ्यांकडुन लाखो रुपयांचे डोनेशन घेवुन प्रवेश देत आहेत तर मराठवाड्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या केवळ विद्यार्थी संख्ये अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा गैरफायदा अनेक खाजगी कोचिंग क्लासेसवाले उचलत असुन या कोचिंग क्लासेस वाल्यांनी शासनाच्या स्वयं अर्थसहाय्य धोरणाचा गैरफायदा घेवुन पश्‍चिम महाराष्ट्रातील खेड्यात कनिष्ठ महाविद्यालये केवळ नावापुरती उघडली असुन प्रवेश मात्र मराठवाड्यातील खाजगी क्लासेस मधुन दिले जात आहेत. अशा प्रवेशासाठी लाखो रुपये पालकांकडुन उकळले जात आहेत, बीड मध्ये असे प्रकार सर्रास होत असल्यामुळे या पार्श्‍वभुमीवर आ. अमरसिंह पंडित यांच्या मागणीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. आ. अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, मराठवाड्यात वैद्यकीय शिक्षणासाठी केवळ ५०० जागा असुन या पैकी ऑल इंडिया कोटा १५ % म्हणजे ७५ जागा त्यासाठी राखीव आहेत,उर्वरित ४२५ जागांपैकी ३० % म्हणजे १५० जागा इतर विभागासाठी राखीव आहेत. म्हणजे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी केवळ २७५ जागा उपलब्ध आहेत, यापैकी मागास प्रवर्गासाठी १३८ आणि खुल्या प्रवर्गासाठी १३८ अशी विभागणी होते. त्यामुळे मराठवाड्यात शिक्षणार्‍या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या बृहत आराखड्यात बीडचा समावेश आहे. त्यामुळे बीड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची नितांत गरज आहे.
   पश्‍चिम महाराष्ट्राकडे जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा थांबवुन पालकांचे आर्थिक शोषण व पिळवणुक थांबविण्यासाठी मराठवाड्यात एम.बी.बी.एस.च्या जागा वाढविणे गरजेचे आहे. या बाबतची आकडेवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या समोर आपण मांडली असुन त्यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही शेवटी आ. अमरसिंह पंडित यांनी सांगितले. आ. अमरसिंह पंडित यांच्या भुमिकेचे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी स्वागत केले असुन अनेक विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

1 comment:

  1. मराठवाड्याचे विकासाभिमुक नेत्रत्व...
    आ. अमरसिंहजी पंडीत साहेब....

    ReplyDelete