तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 3 August 2017

   शुक्रवारी परभणीत निघणार मराठा समाजाची रॅली


पऱभणी, 03-प्रतिनीधी,

मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चाची परभणी जिल्ह्यात जंगी तयारी केली जात आहे. जिल्हा, तालुका आणि गाव ठिकाणी बैठकावर जोर दिला जात असून सोशल मिडीयावरही साद घातली जात आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरात शुक्रवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी  भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.त्यासाठी मोठी तयारी पूर्ण झाली अत्यंत शिस्तीत 

आणि घालवुन दिलेली आचारसंहिता पाळीत ही रॅली निघणार आहे.

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 10 वाजता रॅलीस सुरुवात होणार आहे. त्यासाठी परिसरात असलेल्या आंदोलन मैदानात गाड्या एकत्र येणार आहेत. तेथून ही रॅली स्टेशन, बसस्थानक, उड्डानपूल, जिल्हापरिषद, रायगड कॉर्नर, विसावा फाटा येथुन वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, पुन्हा शिवाजी महाराज पुतळा ते वसमत रोड, शिवाजी महाविद्यालय या मार्गे जात संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात रॅलीचा समारोप होणार आहे. अगदी शांततेत आणि शिस्तीत रॅली काढण्यात येणार आहे. रॅली दरम्याण आचारसंहिता पाळली जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी स्वंयसेवक उभे राहणार आहेत.रॅलीत युवक, विविध पक्षाचे कार्यकर्त्ये, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यासाठी परभणी शहरासह तालुक्यात तयारी सुरु झाली आहे. रॅलीसाठी युवकासंह जेष्ठातही कमालीचा उत्सुकता असून मागील आठवडा भरापासून रॅलीसासाठी दुचाकीवर स्टिकर, भगवे झेंडे लावुन रॅलीसाठी जागृती केली जात आहे. 

No comments:

Post a Comment