Breaking News
Loading...

Friday, 4 August 2017

काळ्या रानाच्या सरीत, हिरव सपान पेरल  लेक उपवर झाली, दारी मांडव सजेल, हिरवा शालू लेउन ती नवरी होईल!!  कळंब येथे रंगली शब्दसरी काव्यमैफल.

 
कळंब (प्रतिनिधी) - रविवारी कळंब येथील संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयात नक्षत्राचे देण काव्यमंच पुणे यांच्या वतीने हैद्राबाद येथील कवयित्री आणि कळंबच्या माहेरवासिन सुरजकुमारी गोस्वामी यांच्या श्रावणमासातिल आगमणानिमित राज्यस्तरीय नक्षत्र माहेरच्या शब्दसरी काव्यमैफल उत्साहदायी वातावरणात पार पडली यावेळी सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लोककवी मदनदादा देगावकर, तर उद्घाटक म्हणून कवी बापू भोंग, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरजकुमारी गोस्वामी तर स्वागताध्यक्ष संधयाराणी कोल्हे, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष परमेश्वर पालकर,मुख्याध्यापक बालाजी जाधवर कवी शेखर गिरी उपस्थित होते. 
संमेलनाध्यक्ष मदन देगावकर यांनी पाऊस पडला तरच शेतकऱ्यांच्ये स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि मुलींचे लग्न होऊ शकतात अशा अशयाची वरील रचना सादर केली त्यानंतर सोलापूर येथील कवी प्रसाद मोहिते यांनी 
"नाही मायेचा आधार, नाही बापाचा सहारा 
कस जगाव, मराव तुच सांग पांडुरंगा" ही अनाथ मुलांची व्यथा सांगणारी रचना सादर केली 
इंदापूर येथील कवी डॉ दत्ता भोसले यांनी खालील कवितेतून पत्नीचे महत्त्व सांगितले 
"विसरू नको रे त्या धर्मपत्नीला, झिजवली तिने काया, मिळणार नाही पुन्हा धर्मपत्नीची माया "
ही कविता सादर करून उपस्थितांना हसवून अंतर्मुख व्हायला लावले. 
  परभणी येथील कवी यशवंत म्हस्के यांनी 
" अरे पावसा तू आला कशाला, सडा आसवांचाच होता पुरे. 
नशिबात माझ्या होता उन्हाळा झळा सोसतानाच होतो बरे "ही कविता सादर करून पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या वेदना कमी होत नाहीत या भावना व्यक्त केल्या 
फलटण येथील कवी प्रमोद जगताप यांनी 
" दारी अंगणी ग बाई आज भरली रांगोळी 
हळदीच्या सुवासात अंग लाजत गव्हाळी 
चंदनाच्या सुवासात काढी एकटी जळती 
माईंच्या ग डोळयात आज आसव गळती "
या कवितेतून मुलगी नांदायला जात असताना आईची अवस्था अधोरेखित केली आहे 
उस्मानाबाद येथील कवी हनुमंत पडवळ यांनी 
" रिमझिम बरसत श्रावण आला, उंच फांदीचा झुला बांधिला. झुलयाला माझ्या वेलीचा दोर, 
फुलवून पिसारा नाचतो मोर "या कवितेतून श्रावण महिना आणि पंचमी सणाचे महत्त्व सांगितले 
कळंब येथील कवी अश्रुबा कोठावळे यांनी 
" तिन माझयाकड पहायच, मी गुलाबासारख फुलायच. तिन दुसर्याला बोलल्यावर मात्र, मला काटा टोचलयासारख वाटायच ही प्रेम कविता सादर केली
तर कळंब येथील कवयित्री कोमल पाखरे हिने "पाऊल पैजणांचे झेलीत मंदवारा
लाजुन तो इशारा चढतोय प्रेम पारा        माझाच चंद्र तेव्हा झोपून गाढ गेला
स्वप्नात सांजवेळी येतोय शुक्रतारा" 
पहारा ही गझल सादर केली आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. या कविसंमेलनात खेंदाड रविंद्र, संजय भालेराव, ज्योती माकोडे, मनिषा क्षीरसागर, राजेंद्र ताचतोडे, संगीता भांडवले, सुवंता तांबे, अमोल अवताडे, गणेश तोडकर, राणी कोकाटे, अनिल रेड्डी, प्रमोद जाधव, कृष्णा शिंदे, वसुंधरा शर्मा, आदि राज्यभरातील कवीनी सहभाग नोंदविला या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन विकास राऊत यांनी केले तर आभार वसुंधरा शर्मा यांनी मानले कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अश्रुबा कोठावळे, तुकाराम आडसुळ, गव्हाणे अंकुश, सुनंदा गायकवाड यांनी परीश्रम घेतले यावेळी कळंब व परीसरातील रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

No comments:

Post a Comment