Breaking News
Loading...

Saturday, 5 August 2017

आता; नागरिकांच्या मालमत्तेवर गेवराई न. प.चा 'जुजबी' कर

सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. 5 __ तब्बल वीस वर्षांत कसलाही त्रास होत नव्हता. नियोजन शुन्य असलेली गेवराई नगर परिषद, ही आता घालून दिलेल्या नियमावर बोट दाखवून नागरिकांच्या मालमत्तेवर जुजबी कर लादणार आहे. कार्यालयाने बजावलेल्या अशा नोटिसामुळे स्थानिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत.
        याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 114 ते 119, 123 व 124 अन्वये प्रभागातील नागरिकांच्या मालमत्तेची फेर आकारणी करण्यात आली. सदरील मालमत्तेवर वार्षिक मुल्य हे दि. 1 जुलै 2017 पासून आकारण्यात आले आहे.  सदरिल फेर आकारणी बाबत हरकती/ आक्षेप असल्यास, हरकतीचे सविस्तर कारणे लेखी स्वरुपात 30 दिवसाच्या आत नगर परिषद कार्यालयाने मागविले आहे. असा आशय बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद असून त्याची अंमलबजावणी गतीने सुरू झाली आहे. याबाबत गेवराई नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.
     गेवराई येथील नगर परिषदेने मालमत्ता धारकांना बजावलेल्या नोटिसात अक्षम्य चुका झाल्या आहेत. पुर्वीच्या व नव्याने लादलेल्या करात कसलाही ताळमेळ बसत नाही. तब्बल आठ पटित भाडे आकारुन येणार असून बहुतांश मालमत्ता धारक हे याविषयी अज्ञानी असून त्यांच्या माथी मोठा अर्थिक भुर्दंड पडणार आहे. नगर परिषदेने वेळीच जुजबी कर लादणार नाही अशी घालून दिलेल्या नियमात तरतूद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment