तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या बंदला प्रतिसाद.


प्रा. डॉ. संतोष रणखांब 
          सोनपेठ : महाराष्ट्रातील  विना अनुदानित असलेल्या सर्व ऊच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक गेली सुमारे १६ ते १७ वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर पवित्र विद्यादानाचे काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांचा अनुदान पात्र याद्या घोषित करून १००%निधी उपलब्ध करावा व तात्काळ १००% पगार सुरु करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय कृती समिती तर्फे दिनांक ०१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विना अनुदान कनिष्ठ महाविद्यालये बेमुदत कॉलेज बंद करून आझाद मैदान,मुंबई येथे आंदोलनास बसण्याच्या अवाहानाला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी बंद पाळला आहे.
                     या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रात विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या जवळपास ३२०० च्या वर आहे.सदर महाविद्यालात सुमारे २२५०० शिक्षक बांधव सुमारे १६ ते १७ वर्षांपासून शासनाकडून एक रुपयाही न घेता पवित्र ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. दिनांक २६/०२/२०१४ रोजी राज्य शासनाने संबंधित महाविद्यालयाचा कायम शब्द काढून अनुदानासाठीची मुल्यांकन प्रक्रिया सुरु केली. परंतु आजपर्यंत सुमारे ०३ वर्षे संपूनही अनुदानपत्र शाळांची यादी घोषित केली नाही.या बाबत समितीने आजपर्यंतमुंबई,पुणे,नागपूरसह संपूर्ण विभागात,जिल्ह्यात,तालुक्यात सुमारे २०३ आंदोलने लोकशाही मार्गाने देखील केली.  मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे फक्त आश्वासनावरच बोळवण केली गेली.शासनाचे शिक्षणविषयीचे धोरणच आजपर्यंत कमकुवत राहिले असून याचा फटका मात्र राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. परिणामी शिक्षकावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.या सोबतच रक्तदाब,हृदयविकार,व आत्महत्त्या सारख्या घटना घडत आहेत.तरी देखील शासनाला अद्याप पर्यंत ह्या शिक्षकांची दया आलेली नाही. म्हणून सोनपेठ तालुक्यातील सर्व विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र यादी घोषित करून १००% निधीची तरतूद करून,तात्काळ पगार सुरु करावी या मागणीसाठी राज्यातून सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ०१ ऑगस्टला महाराष्ट्र विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून पाठींबा दिला आहे.  महाविद्यालये बंद ठेवून आंदोलन करण्यास शासनचं जबाबदार असल्याचे कृती समितीने म्हटलेले आहे. तरी या आंदोलनात सर्व सोनपेठ तालुक्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पूर्णपणे आपले कॉलेज बंद ठेवून सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment