तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

अवैध वाळु वाहतूक करणा-या चार वाहनावर गुन्हा दाखल.


तेजन्युज सोनपेठ / प्रा.संतोष रणखांब .

तालुक्यातील मौजे पोहंडूळ येथील गौदावरी पाञातुन शासनाच्या परवानगी शिवाय ट्रक्टर व टिप्परमध्ये जेसीबीच्या साह्याने अवैध वाळुउपसा करणाऱ्या चार वाहना विरूध्द दिनांक 2 ऑगस्ट बुधवार रोजी सोनपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 96/2017 भादवी कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  तालुक्यातील मौजे पोहडूळ येथील गोदावरी पाञातुन एक ऑगस्ट रोजी राञी साडे नऊच्या दरम्यान टिप्पर व ट्रक्टरच्या साह्याने अवैध वाळू उपसा करीत आसल्याची माहिती महसुल विभागाच्या कर्मचारी यांना कळाल्याने महसुल विभागाच्या अधिका-यास नदिपाञातुन ट्रक्टर क्र.MH 22 H 5507 या ट्रक्टरने दोन ब्रास भरलेले व काही अंतरावर असलेल्या अवैध रेती साठ्यालगत असलेल्या टिप्पर क्र MH 24 AB 9550 ,MH 23 C 8218 व जेसीबी क्र. MH 22 AD 1527  या मध्ये चार ब्रास वाळू असल्याचे आढळून आले असून या चारही वाहनाचे चालक महसूल पथकाला पाहून पळून गेले.या प्रकरणी चार वाहनाच्या चालक व मालका  विरूद्ध अवैध रेती उत्खन वाहतुक नीर्गमन या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या पथकात तलाठी अनिल कदम,पंच आश्रोबा कु-हाडे,पोलिस उपनिरिक्षक  बि.आर.जाधव,पो.काॅ.परसोडे हे होते याप्रकरणाचा पुढील तपास देवराव मुंडे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment