तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

गुरू गंगाधर स्वामी मठ प्रकरणी स्वामीचा पराभव समाजाचा विजय वादग्रस्त नामांतर प्रकरणात पालिकाच दोषी अधिकेलेले नामांतर पून्हा केले रद्द स्वामी विरूद्ध समाजाच्या मठ प्रकरणी तत्कालिन मख्यधिकारी दोषी ?


सेलू प्रतिनिधी
येथील गुरू गंगाधर स्वामी मठ संस्थान मधील गैर कायदेशीर मंडळींनी विरशैव
समाजाचे आराध्यदैवत असलेले गुरू गंगाधर स्वामी मठ संस्थान घर क्र. 5/170
ही मालमत्ता निजामकालिन असून दि. 28-10-1995 नूसार न. प. कडे वर्ग
करण्यात आली होती. मुळात या जागेची नोंद मठ अय्या पेठ मोहला या नावाने
नोंद होती. परंतू येथे राहणारे सुभाष स्वामी, शैल्यस्वामी, रेखा स्वामी,
व प्रसाद स्वामी यांनी ही मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतली.
त्यावेळी कोणते निकस लावले व समाजाची ही संपत्ती स्वामी परिवारास बहाल
करण्यात आली. तेव्हा असलेले पालिकेचे मुख्यधिकारी व कार्यालयीन अधिक्षकच
जबाबदार आहे. हे प्रकरण समाजाने रेटल्यामुळे आधी केलेले नामांतर पून्हा
रद्द करून या प्रकरणात स्वामी परिवाराचा पराभव करून समाजास मालमत्ता बहाल
केली ऐवढेच आहे. वास्तविक या वादाचे कारणचं नगर पालिकाच आहे. पालिकेने
स्वामीला तर न्यायालयांच्या दनक्याने समाजाला ही मालमत्ता हस्तातरीत
करण्यात आली आहे. जागेचा वाद राचलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनानंतर
गुरू गादी भरण्यावरून निर्माण झाला. शिवा अखिल भारतीय विरशैव युवक
संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या पर्यत हे प्रकरण गेले.
त्यानंतर धर्मदाय आयुक्ता पासून पालिका व महसूल प्रशासन यांना माहिती
देण्यात आली. तत्कालिन मुख्यधिकारी यांनी साधी पी. टि. आर. नक्कल
देण्याचे सौजन्य दाखविले नाही. समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या शिव
संघटनेने हे प्रकरण धसास लावण्याचे ठरविले. त्याना आमदार विजय भाबळे
यांनी सहकार्य करत प्रकरण मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
सुनावणी घेण्यात आली. याच प्रकरणात 17 जूलै 2017 रोजी दिवाणी न्यायाधीश
कनिष्ठ स्तर सेलू यांनी मनाई हुकूमाच्या आर्जावर आदेश देत प्रसाद स्वामी
यांच्या विरोधात आदेश पारित करून हुकूम काढला सदरिल मालमत्ता गुरू गंगाधर
स्वामी मठ संस्थेची असे नामांतर करण्यात आले. आणि त्याची पी. टि. आर.
नक्कल निद्यमान नगर अध्यक्ष विनोद बोराडे यांनी शिवा संघटनेचे तालूका
संचालक शिवकुमार नावाडे यांच्या कडे सुपूर्द केली. या मठाची मालकी कोणाची
आहे. समाजाची की स्वामी परिवाराची हा संघर्ष तत्कालिन मुख्याधिकारी यांनी
घडवून आणला आणि न्यायालयाने दणका दिल्यानंतर परत पालिकेचे चुकीचे केलेले
नामांतर रद्द केले. या प्रकरणी प्रसाद स्वामी परिष्ठ कोर्टात दाद मागणार
असल्याने पालिकेने सुरू केलेला मालकी हक्काचा संघर्ष संपला नसून सध्या
स्वामी परिवाराचा पराभव झाला आणि समाजाचा विजय ऐवढेच या प्रकरणी म्हणता
येईल.

◾आम्ही नैसर्गिक न्यायाच्या प्रतिक्षेत – प्रसाद स्वामी
उपजिल्हाधिेकारी कार्यालयात अतियात चौकशी अंतर्गत प्रलंबित असलेल्या गुरू
गंगाधर स्वामी मठ प्रकरणी नुकताच सेलू न्यायालयाने तात्पूरता मनाई हुकूम
उठवला. विद्यमान मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचे निर्णयास
पुर्णनिरिक्षण कार्यवाही प्रलंबित असताना या बाबतची माहिती दडवून ठेवत
मुख्याधिकारीच नैसर्गिक न्यायापासून दूर ठेवत असून शिवाय तात्पूरत्या
मनाई हूकुमाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या मुदती अगोदरच तात्पूरत्या
मनाई हुकूमाच्या आधारे त्याच दिवशी मुख्याधिकारी यांनी निकाल देत
नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी
प्रसाद स्वामी यांनी प्रतिक्रीया देतांना व्यक्त केला.

No comments:

Post a Comment