Breaking News
Loading...

Tuesday, 1 August 2017

पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ

सुभाष मुळे..
-----------
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक झाली.
     कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मुख्य सचिव सुमित मल्लीक, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.
योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 जुलै 2017 पर्यंत होती, परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे अर्ज जमा करायचे राहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्ट पर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील. मुदतवाढ देतांना csc ( जनसुविधा केंद्र ) येथे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. बँकेतच अर्ज स्विकारले जातील. बँकांना मुदतवाढी बाबत इ मेल द्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्या मार्फत सुचित करण्यात येत आहे असे राज्याचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगीतले आहे. शेतकरी बांधवानी काळजी करु नये, मुदतीत शेतकरी बांधवांनी अर्ज करावे असे आवाहन श्री. फुंडकर यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment