तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

मराठा क्रांती मोर्चा जनजागरण भव्य मोटार सायकल रँली संपन्न


सोनपेठ / प्रतिनिधी
सोनपेठ : मुंबई येथे होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्त येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा शिवमती पुष्पाताई बालासाहेब इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. व मोटार सायकल रँली प्रारंभ करण्यात आली.
      मोटार सायकल रँली संपुर्ण शहरातून प्रमुख मार्गाने मार्केट कमीटी प्रांगणात विसर्जीत करण्यात आली. सकल मराठा समाज बांधवांसह या मागण्यांना पाठींबा देण्याऱ्या समाज बांधवांना मुंबईच्या क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी हे जनजागरण करून अवाहन करण्यात आले,यावेळी आरक्षण मिळावे, कर्जमाफी मिळावी व महापुरूषांच्या जयजयकाराच्या विवीध घोषणांनी शहर दुमदुमले होते. भगव्या पताका लावलेल्या मोटारसायकल सर्वांचे लक्ष वेधत होत्या.यावेळी मोठ्या संख्येने  मोटारसायकल स्वार व  सकल मराठा समाज  बांधव सहभागी झालेले होते.

No comments:

Post a Comment