तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

महापुरुषांना समजून घेण्यासाठी साहित्य वाचा - प्रा. अशोक मुंढे


सुभाष मुळे..
-------------------
गेवराई, दि. 1 __ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. त्यांना समजुन घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचा. त्यांच्या पुस्तकाचे पारायणे करा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. अशोक मुंढे यांनी केले.
      गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १ ऑगष्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती  साजरी करण्यात आली, यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीमती सिंधुताई दाभाडे या तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक सानप आर.एस. पर्यवेक्षक गायकवाड के. एन. विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शिवाजी पवळ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बी के. शेवाळे पवळ आदी उपस्थित होते. प्रा.श्रीमती सिंधुताई दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे आणि  लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. विद्यार्थी सर्वश्री रामेश्वर पांचाळ, कु.निकिता मोहिते, कु.प्रतिक्षा पवार, कु.रुपाली आडाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आर.डी. जाधव यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सत्यप्रेम लगड यांनी केले तर आभार प्रा. जायगुडे यांनी मानले.
   यावेळी प्रा.गायकवाड, प्रा. देवकर, प्रा.चौधरी, प्रा.बोरवडे, श्री.सुतार यांच्यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment