तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

पावसाने दडी मारली..पिक विम्याची पण आस संपली जितू चोले


माहूर/प्रतिनिधी

माहूर :काल दि.04-08-2017 पिक विमा  काढण्याची शेवटची तारीख होती म्हणून शेतक-यांनी माहूर मधील सर्व बॅंका व सेतू-सुविधा केंद्रावर तुफान गर्दी केली होती.

सर्व राष्ट्रीय कृत बॅंकांनी सायंकाळी 4.30 वाजताच शटर डाऊन केल्याने बॅंकांचे शेतक-यांविषयी कीती भावना शुन्य प्रेम आहे हे काल निदर्शनास आले.

ना कोणी  लोकप्रतिनिधींनी बॅंक कींवा सेतू-सुविधा केंद्रावर जाऊन भेट दिली कींवा शेतक-यांचे हाल अपेष्टा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

काल सुध्दा  विमा कंपन्यांनी सर्वर डाऊन ठेवला होता त्यामुळे शेतक-यांची एकच तारांबळ उडाली व अनेकांनी बॅंक बंद झाल्यावर सेतू-सुविधा केंद्रावर रात्री 12 वाजेपर्यंत उपाशी पोटी ठाण मांडून बसले होते.
परंतू पिक विम्याची वेबसाईट एवढी बीझी होती की जिथे 150 फाॅर्म स्विकारले जात होते तिथे काल दिवसभर केवळ  30 फाॅर्म  अपलोड झाले असे प्रिश कंप्युटर चे संचालक श्री.पवन बोरकर यांनी सांगितले व अनेक शेतक-यांची पिक विमा न भरल्याने निराशा पदरी पडली व काहींनी पिक विमा कंपनी विरूध्द निषेध व नाराजी व्यक्त केली.

प्रिश सेवा सुविधा केंद्रावर भाजपा कार्यकर्ते सुमित राठोड व शिवसेनेचे कार्यकर्ते  विकी तामखाने यांनी फाॅर्म घेतांना कोणताही घोळ होऊ नये कींवा कोणताही अनुचित प्रकार  घडू नये यासाठी रात्री 12.30 पर्यंत शेतक-यांसोबत तळ ठोकून सेवा-सुविधा केंद्राला व शेतक-यांना मदत केली तसेच अनेक पुरूष व महिलांना शेतक-यांना बसण्यासाठी सतरंजी, पिण्याचे  पाणी व नाश्ता जागेवर उपलब्ध करून दिला या बद्दल शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment