तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 2 August 2017

पिलीवचा"दिपक जनवर"बँक अॉफ इंडियाच्या खातेदारांची अडीच लाखांची फसवणूक करुन झाला फरार......!


---------------------------------------------------
            पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बँक अॉफ इंडिया शाखेतील बिझनेस करस्पाउडंट (BC) दिपक पोपटसिंग जनवर रा.पिलीव (वय 28 वर्ष) याने बँक ग्राहक व बँकेतील 2 लाख 56 हजार आठशे नव्वद रुपयांचा अपहार केल्याचे समोर येताच शाखा व्यवस्थापक मोहनराव जाधव यांनी दिपक जनवर या भामट्याच्या विरोधात पिलीव पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदविली आहे.सदर प्रकरणाची पिलीव पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती आशी कि दिपक जनवर याने दिनांक 17 मे 2017 ते 2 जून 2017 अखेर तांदुळवाडीचे बँक अॉफ इंडियाचे खातेदार बालम यासीन काझी यांनी वेळोवेळी अनुक्रमे 50 हजार व 70 हजार असे एकुण 1 लाख 20 हजार रुपये दिपक जनवर याच्याकडे खात्यावर जमा करण्यासाठी दिले होते व तसे बँकेचे चलनही केले होते.परंतु बालम काझी हे काही दिवसानंतर आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी व आपले पासबुक प्रिंट मारुन (छापून) घेण्यासाठी बँकेत गेले असता त्यांच्या खात्यावर रक्कमच जमा नसल्याचे निदर्शनास आले.यानंतर काझी यांनी त्वरितच बँक व्यवस्थापकांना काऊंटर रिसीट दाखविली असता सदर रकमेचा बँकेत भरणाच केला नसल्याचे निष्पन्न झाले.सदर प्रकरणाची खात्री करण्यासाठी शाखा व्यवस्थापकांनी दिपक जनवर यास फोन करुन बँकेत बोलावले असता दिपक जनवर या भामट्याने बँकेत न येता आपला मोबाईल बंद करुन पिलीवमधून पलायन केले आहे.यानंतर दिपक जनवर हा फरार असल्याने त्याने आणखी कुणाची फसवणूक केली  आहे का याची चौकशी केली असता झिंजेवस्ती येथील ग्राम संस्था 32 हजार 700,सुहाना स्वंय साह्यता महिला बचत गट 5 हजार 800,सिध्दी स्वंय साह्यता महिला बचत गट झिंजेवस्ती 3 हजार 980,यशस्विनी स्वंय साह्यता महिला बचत गट सुळेवाडी 12 हजार 640,आहिल्या देवी स्वंय साह्यता महिला बचत गट सुळेवाडी 4 हजार 800,सद्गुरु समर्थ स्वंय साह्यता महिला बचत गट सुळेवाडी 4हजर 400,सोमनाथ जनार्धन कांबळे 2 हजार,श्री.श्री स्वंय साह्यता महिला बचत गट 30 हजार 570, बापूराव गोवर्धन आवताडे 10 हजार,किसन ज्ञानोबा कदम 20 हजार व जयश्री दिलीप शिंदे 10 हजार यांचीही दिपक जनवर या भामट्याने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.वरील दहा व तांदुळवाडी येथील बालम काझी आशा अकरा खातेदारांची एकुण रोख रक्कम रुपये 2 लाख 56 हजार 890 रुपये ही रक्कम बँकेत जमा न करता दिपक जनवर या भामट्याने हाडपली आहे व सध्या तो फरार आहे.सदर घटनेप्रकरणी दिपक जनवर याच्यावर भा.द.वी कलम 420 अन्वये पिलीव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हां नोंद करण्यात आला असून पुढील तपास पिलीव औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार हे करित आहेत.

No comments:

Post a Comment