तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

भारतीय स्टेट बॅंक रोजगार प्रशिक्षण

महेंद्र महाजन जैन रिसोड

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) वाशिम येथे आज दिनांक 04/08/2017 रोजी 'ब्युटी पार्लर मॅनेजमेंट' प्रशिक्षण क्र. 100 चा उदघाटन समारंभ मा. श्री. व्ही. एम. पोतदार, SDR NACER, (महाराष्ट्र) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री. विजय नगराळे, LDM, वाशिम आणि मा. श्री. जॉली अब्राहम, मुख्य प्रबंधक, SBI वाशिम शाखा यांच्या उपस्थिती मध्ये आनंदात पार पडला. प्रथम दीपप्रज्वलन करून माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले. तदनंतर मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले आणि उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले, यामध्ये आरसेटी उगम, स्वयं रोजगाराचे महत्व आणि बँकिंग व्यवहार बद्दल माहिती दिली, तसेच जास्तीत जास्त युवक युवतींनी आरसेटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आरसेटी च्या 100 क्रमांकाच्या प्रशिक्षण उदघाटन समारंभाचे औचित्य साधून SBI वाशिम शाखेचे मुख्य प्रबंधक श्री जॉली अब्राहम यांची मुख्य प्रबंधक (CM) वरून सहाय्यक महाप्रबंधक (AGM) पदी पदोन्नती झाल्याबद्दल श्री पोतदार सर यांनी आरसेटी वाशिम परिवाराच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षण हे 30 दिवसाचे असून यामध्ये 35 विद्यार्थिनींनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे व या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत केलेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खिल्लारी, फॅकल्टी यांनी तर आभार प्रदर्शन आशिष राऊत, सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमाला आर सेटी कर्मचारी योगेश चौहान, महेंद्र सम्रत तसेच तज्ञ प्रशिक्षिका रेखा खडसे उपस्थित होते. अतिउत्साहपूर्ण वातावरणात हा प्रशिक्षण शतक सोहळा पार पडला.

No comments:

Post a Comment