तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

अर्धामसला फाटा ते पंचमुखेश्वर संस्थानची रस्त्याची दुरावस्था

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 1 __ तालुक्यातील अर्धामसला फाटा ते भाटेपुरी (तळा) या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. सदरिल रस्ता नव्याने तयार करण्यात यावा अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे.
         श्रावण महिन्यात दर सोमवारी गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी (तळा) येथे मोठय़ा प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. अर्धामसला फाटा ते भाटेपुरी (तळा) या रस्त्याचे अंतर केवळ दोन किलोमीटर असुन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 222 या रस्त्यास जोडला गेलेला आहे. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील वाहन चालकांना मनक्याचे आजार झालेले आहे. वाहनांचा देखील खिळखिळाट झाला असून नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
      रस्ता खराब असल्याने भाविकांना ञास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे भाविकांसाठी धोक्याचे ठरत आहे. दोन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरही राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी भाविकांसह राजु खळगे, विशाल लव्हे, अविनाश राऊत, साहिल शेख, नारायण मस्के, शेख अजहर यांनी केली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment