Breaking News
Loading...

Saturday, 5 August 2017

शास्त्रीय कौशल्य मानवी समाजाला सुखी बनवण्यासाठी कार्यरत असते - प्राचार्य चव्हाण


सोनपेठ: येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत चव्हाण, प्रमुख उपस्थिती प्रा. सदाशिव मुंडे, प्रा. संदिपकुमार देवराये, प्रा. विकास रागोले, प्रा. डॉ. संतोष रणखांब तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील होते.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हिमेटॉलॉजी व युरीनॉलॉजीचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान प्रसंगी सुरूवातीला प्राणिशास्त्राचे जनक अरिस्टॉटल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य प्रशांत चव्हाण यांनी रक्त  व लघवी तपासण्या व त्यामुळे वैद्यक शास्त्राला होणारी मदत किती महत्वाची असते तसेच प्रात्याक्षिक किती महत्त्वपुर्ण असतात याचे विश्लेषण करून वैज्ञानिक कौशल्यामुळे मानवी समाजाला सुखी करण्यासाठी महत्त्वाचे कार्य होऊ शकते. एखाद्या रोगाने पिडीत व्यक्तीला त्या पिडेतून सोडवण्याचे सामर्थ्यही शास्त्रीय कौशल्यात असते असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप मुकूंदराज पाटील यांनी केला.
सुत्रसंचालन प्रा. जगदिश भोसले यांनी, प्रास्ताविक प्रा. विठ्ठल मुलगीर यांनी तर आभार प्रा. रोहीणी भाग्यवंत यांनी मानले. यावेळी विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment