तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून श्रीसंत शंकरस्वामींचा लौकिक : उद्धव महाराज मंडलिक... स्वामींच्या सप्ताहाची उत्साहात सांगता , सुमारे साठ हजार भाविकांची उपस्थिती,

शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द
    
संत तुकोबारायानंतर अध्यात्मिक अध्यात्मिक मार्ग दाखविणारे शंकरस्वामी महाराज यांचे कार्य अलौकिक असून श्री संत शंकरस्वामींचे व्यासपीठ हे राज्यातील सर्वात मोठे व महत्वाचे व्यासपीठ आहे , अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे वारकऱ्यांचा महाउत्सव असून संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी हरीनाम सप्ताह गरजेचा आहे, असे प्रतिपादन ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
श्री संत शंकरस्वामी संस्थान फडाचा २७२ वा अखंड हरीनाम सप्ताह वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे दि.२८ जुलै ते ०४ ऑगस्ट दरम्यान संपन्न झाला , सप्ताहाच्या सांगतेवेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

          “येद्से चरित्र केले नारायणे” या अभंगावर विवेचन करतांना त्यांनी भगवान श्री कृष्णाचे जीवन चरित्र कथन केले.

          संसारिक ठेवा हे संपणारे धन आहे मात्र पारमार्थिक धन चिरकाल टिकणारे असून पारमार्थिक धनाने पिढी संस्कारित केली जाते, भाववृत्तीने केलेला परमार्थ हा सफल ठरतो.भक्तीभाव तिथे देव असून  परमार्थाने मन,बुद्धी अंतकरण शुद्ध होते. दोषमुक्क्तीसाठी परमार्थ करा असे आवाहन मंडलिक महाराज यांनी कीर्तनात केले.

संताचे सामाजासाठी भौमोल योगदान असून विवादाकडून संवादाकडे हीच संताची शिकवण आहे. स्वामींच्या सप्ताहाची अध्यात्मिक अखंडीत सेवा असून यातून ज्ञानदन व अन्नदान घडत आहे. या परंपरेचा अभिमान असून एकोप्याची शिकवण श्रीकृष्णाने दिली असून सर्वांच्या सहकार्य व सहभागातून मिळणारा आनंद विशेष असतो असेही उद्धव महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले.

        भारत देशासाठी शत्रू ठरत असलेल्या चीन बनावटीच्या वस्तू न वापरण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. श्री कृष्णाचे जीवनचरित्र काही लोक विचित्र पद्धतीने जगासमोर मांडत असल्याची खंत उद्धव महाराज  मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केली.

        या वेळी श्रीसंत शंकरस्वामी महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर, संस्थानचे उपाध्यक्ष, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, आमदार सुभाष झांबड, संजय निकम, विश्वास पाटील,कैलास पवार, स्वामीचे वंशज बंडोपंत लाखेस्वामी, प्रकाशलाखेस्वामी, ढेकू आश्रमचे देव बाबा, चंद्रभान दादा चिकटगावकर, भोलेगिरी महाराज, भागीनाथ मगर, लोणीचे सरपंच रिखब पाटणी, शिऊरचे सरपंच नितीन चुडीवाल,
पी आर जाधव, राजेंद्र मगर, उत्तम निकम, दत्तात्रय जाधव, सारंगधर महाराज भोपळे, गणेश सोमासे, गोकुळ आहेर सर्जेराव जाधव , शिरीष चव्हाण, शिवाजी साळुंके यांच्यासह राजकीय पदाधिकारी, महाराज, व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

पुढील सप्ताह बिलोनी येथे

श्री संत श्री संत शंकरस्वामी संस्थान फडाचा २७३  वा अखंड हरीनाम फिरता नारळी सप्ताह वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथे होणार असून बिलोनी येथील ग्रामस्थांना पुढील सप्ताहाचे श्रीफळ देण्यात आले.

सुमारे साठ एक लाख भाविकांची उपस्थिती, कमी वेळात महाप्रसादाचे वितरण

या अखंड हरीनाम सप्ताह सांगतेप्रसंगी तब्बल साठ हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते, सर्व भाविकांना अगदी कमी वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, तर ड्रोन द्वारे छायाचित्रण करण्यात आले.

शिस्तीचे व एकोप्याचे दर्शन

या अखंड हरीनाम सप्ताह कालावधीत लोणी येथील स्वयंसेवक यांनी शिस्तीचे दर्शन घडविले तर ग्रामस्थांनी हेवेदावे बाजूला ठेऊन जातीयतेला मूठमाती देत एकोप्याचे दर्शन घडविले, सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून या सप्ताहाने लौकिक मिळविला. सप्ताह यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार व परिश्रम घेतले.

छायाचित्रे शांताराम मगर

No comments:

Post a Comment