तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

पीएमआरडीए कडून लवासाची चौकशी केली जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधानसभेत घोषणा.

_________________________

पुण्यातील ‘लवासा’ही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. येत्या तीन महिन्यात ‘लवासा’ची चौकशी केली जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथोरिटी अर्थात पीएमआरडीए कडून ही चौकशी केली जाणार आहे.“लवासा सिटीमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. पर्यावरणाला हानिकारक ठरणारं काम लवासात आहे, तरीही कारवाई का केली नाही...?”, अशी विचारणा भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी केली होती. त्यावेळी, “लवासामुळे पर्यावरणाला हानी झाल्याचे निदर्शनास आले नाही, त्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.”,असे उत्तर तापकीर यांच्या प्रश्नाला देण्यात आले.मात्र, आमदार भीमराव तापकीर यांनी पुन्हा विधानसभेत सांगितलं की, लवासामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आले आहे.राज्य सरकारने 2008 साली लवासा सिटीसाठी विशेष नियोजन प्रधिकरणाचा दर्जा दिला. त्यातील बांधकांमा विषयक नियमालवली नुसार पर्यावरणाचे निकष पूर्ण करणारी बांधकामं लवासात करण्यात आली आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, लवासाच्या चौकशीची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

No comments:

Post a Comment