Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

शेतकऱ्यांचा पिक विमा तातडीने भरुन घ्यावा - विजयसिंह पंडित

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २ __ शासनाने पिक विमा योजनेचा हप्ता आॅफलाईन भरण्यास परवानगी न दिल्यामुळे मुदतवाढ मिळुनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार आहेत. पिक विमा प्रश्नावर विरोधी पक्ष नेते श्री धनंजय मुंढे आणि आ. अमरसिंह पंडित यांनी वेळोवळी सरकारला धारेवर धरले मात्र सरकारलाच पिकविमा मिळु द्यायचा नाही. त्यामुळे शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहु नये. शेतकऱ्यांत तिव्र असंतोष असून मागिल सात दिवसापासून हजारो शेतकरी काम धंदा सोडून बँकेच्या दारात उभे आहेत .या शेतकऱ्यांचा पिकविमा तातडीने भरुन घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.
    प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात विजयसिंह पंडित पुढे म्हणतात की, प्रधानमंत्री शेतकरी पिकविमा योजनाने शासनाने मोठा गाजावजा करुन सुरु केली, पण आज पिकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बँकांच्या दारात रांगा लागलेल्या आहेत. पिक विमा प्रश्नावर विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंढे आणि आ. अमरसिंह पंडित यांनी वेळोवळी सरकारला धारेवर धरले, मात्र सरकारलाच पिकविमा मिळु द्यायचा नाही. पिकविमा आॅफलाईन पद्धतीने भरुन घेतला जात नाही, आॅनलाईन व्यवस्था कोडमडली, सर्वर बंद पडणे अशा अनेक समस्या शेतकऱ्यासमोर उभा राहिल्या. आता पिकविमा भरण्यास मुदतवाढ मिळुनही हजारो शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत. आज बँका पिक विमा भरुन घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.
        मागिल सात दिवसापासून हजारो शेतकरी काम धंदा सोडून बँकेच्या दारात उभे आहेत. त्यांचा अंत आता सरकारने पाहु नये. शेतकऱ्यांचा पिक विमा आॅफलाईनने स्विकारण्यास बँकांना सांगावे व पिकविमा तातडीने भरुन घ्यावा असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment