Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

साखरा परिसरातील पिके पावसा अभावी सुकून जाऊ लागली

साखरा प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे

साखरा व परिसरात अस्मानी संकटाने शेतकरी हताश झाले आहेत. जुन महिण्यात मृग नक्षञात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गानी पेरनीची कामे हाती घेतली दोन तिन दिवस शेतकऱ्यांनि पेरनी  केली व नंतर पाऊस  थांबला तर  शेतकऱ्यानी देखिल पेरनी थांबवली तब्बल दहा दिवसा नंतर (२६)जुनला परिसरात जोरदार जोरदार पावसाने सुरवात केली त्यानंतर (२७)जुन पासुन थांबलेल्या पेरनीला सुरवात झाली चार दिवसा त परीसरातील पेरनी पुर्ण झाली पेरनी झाल्या नंतर परत काही दिवस पावसाने  उघडीप दिली व त्या नंतर परत परिसरात रिमझिम पाऊस पडण्यास सुरवात झाली रिमझिम पावसाने पिकांची खुंटलेली वाढ पीक वाढीस सुरवात झाली    व लागलीच शेतकऱ्यानी अंतरपिक मशागतीला जोमाने सुरवात केली तर पिकेही बहरू लागली तोच मागील अठवड्यापासुन परत पावसाने पाठफिरवील्याने व कडक उन पडत असल्याने आता परीसरातील पिके पहावेनाशी झाली आहेत कडक उन तापत असल्याने दुपारी पिके माना टाकत असल्याचे पाहुन शेतकरी वर्ग हताश झाली आहे महागा मोलाचे बियाने ,खते ,फवारनीसाठी   जवळची माया पुंजी शेतात  खर्च केली व निसर्ग कोपल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिकक्षेत अाहेत गेल्या तिन वर्षापासुन शेतकरी ह्या दुष्काळी परीस्थितीचा सामना करत आहेत तर या वर्षि चांगले ऊत्पन्न मिळेल ह्या आसेवरच शेतकरी जगत आहेत निसर्गाच्या लहरीपनाने शेतकरी माञ मेटाकुटीला आला आहे.

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वहिनी
साखरा प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment