तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 August 2017

आर. के. पब्लिक स्कुल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 19 __ येथील आर. के. पब्लिक स्कुलमध्ये भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
     याप्रसंगी पार्थ प्रतिष्ठान संस्थेचे सचिव आर. के. चाळक सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा योगिता चाळक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चाळक प्राचार्य प्रा. गणेश चाळक पालक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
    ध्वजारोहन नंतर प्रशालेतील चिमुकल्यांनी स्वतंत्रादिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्रीमती मनीषा मिस व श्रीमती प्रिया मिस यांनी स्वतंत्र्य दिनाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप आर. के. चाळक सर यांनी केला. शेवटी आभार श्रीमती भारती मिस यांनी मानले व संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रत्नमाला मिस यांनी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment