तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 August 2017

परतूर रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अभियान; शाळा,काॅलेजचा सहभाग रेल्वे विषयी अमुल्य मार्गदर्शन


परतूर 
प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साद देत दक्षिण मध्य रेल्वेच्या परतूर रेल्वे स्थानकावर स्वातंञ दिनाचे औचित्य साधत स्वच्छता पंधरवाडा साजरा करणार असल्याचे स्टेशन मास्टर शंकरलाल मिना यांनी सांगितले.

बुधवार रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ,लाॅयन्स क्लब परतूर,ब्राईट स्टार इंलिश स्कुल,व लाल बहादुर शास्ञी महाविद्यायातील विद्यार्थीत्या सह विविध सामाजिक संघटनांचे पदधिकारी ,आजी ,माजी,

लोकप्रतिनिधी,शिक्षक व रेल्वे संघटनांचे पदधिकारी,कर्मचारी,व अधिकारी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड परिमंडळाचे वरिष्ठ यांञिक अभियंता मुर्ती यांच्या हस्ते स्वच्छता अभियांनाचा शुभारंभ झाला.यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,लाॅयन्स कल्ब चे अध्यक्ष मनोहर खालापुरे,नगरसेवक राजेश भुजबळ,बाबुराव हिवाळे,राजेश खंडेलवाल, स्टेशन मास्टर शंकरलाल मिना,बाबुलाल मिना,यांची उपस्थिती होती.

यावेळी स्टेशनच्या दोन्ही प्लाॅट फाॅम ,स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅन्ड ,मंदीर परिसर स्वच्छ करून  साफ सफाई करण्यात आली.या स्वच्छता अभियानात पहिल्या दोन दिवसात शहरातील शाळा,काॅलेजच्या 200-300 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

स्वच्छता हा प्रगतीमधील  एक महत्वाचा घटक असुन तो प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छता राखत सामाजिक स्वच्छता देखील राखली पाहिजे.यामुळे देशाची व आपल्या प्रगतीत हातभार लागेल.सार्वजनिक परिसराची स्वच्छता राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.ते आपण न चुकता पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन वरिष्ठ अभियंता श्री.मुर्ती यांनी या प्रसंगी व्यक्त केले. शेवटी रेल्वेच्या कार्या विषयी माहिती देऊन भारतीय रेल्वेत कसे सहभागी होता येईल याच्यावर सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.

वैयक्तिक घराप्रमाणे नागरिकांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा.
शंकरलाल मिना
स्टेशन मास्टर .परतूर

No comments:

Post a Comment