Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

दैनिक दिव्य प्रभात चे संपादक राहुल भाकरे यांचे दीडच्या दरम्यान आपघाती निधन

पत्रकारित्रातील एक 'हिरा' अकाली  निधनाने मंगळवेढेकरांनी गमावला.

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील रहिवासी दीड वर्षांपूर्वी स्वतःचे सोलापूर दैनिक दिव्य प्रभात दैनिक काढून मंगळवेढ्याच्या घराघरात आपली ओळख निर्माण केलेले मितभाषी राहुल भाकरे यांचे रात्री मंगळवेढा येथून अंकाचे काम संपवून घरी जाताना अपघाती निधन झाले..

तालुक्यात स्फोटक पत्रकार म्हणून त्यांनी चांगला जम बसविला होता सर्वसामान्य लोकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून त्यांची पत्रकारिता कार्यरत होती तालुक्यातील अवैध वाळूप्रश्न त्यांनी चांगलाच गाजविला होता..आपले कुणीच नाही ऐकले तर राहुल नक्कीच आपल्या प्रश्नाला वाचा फोडणार असे प्रत्येक सामान्य नागरिकांचे मत असायचे असा हा सर्वसामान्य लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेला संपादक अपघाती निधनाने जाणे कुणालाच विश्वास न बसण्यासारखे आहे..

No comments:

Post a Comment