तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

________________________

दहशतवाद्यांच्या एन्काऊंटर नंतर काश्मीर मधील पुलवामा मध्ये मोबाईल आणिइंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा येथे वीज उपकेंद्रातून कोणतीही पुर्व सुचना न देता विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला.


हिंगोली जिल्हा आकाराने लहान असला तरी जिल्ह्यातले गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आलीय. शिवसेनाआणि मनसेच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांना तडीपार करण्यात आलंय.

परभणी = बहुचर्चित खून प्रकरणातील आठ जणांना अटक, शिवसेनेच्या अमरदीप रोडे सह तीन नगरसेवकांचा खुनाच्या कटात समावेश, बड्या व्यापार्यांचाही खुनात हात, दोन महिन्यानंतर चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात,अद्याप 5 जण फरार

‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी कीर्ती असलेला धावपटू उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार आहे. लंडन मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकावून शेवट गोड करण्याचा बोल्टचा मानस आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची बंद दाराआड तासभर झालेली चर्चा, सध्या चर्चेचा विषय आहे.

ऑनलाईन सातबाराच्या जनजगृतीसाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकलवारी केली. महसूल दिनाचं औचित्य साधून अकोल्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

ब्लू व्हेल गेमच्या नादापायी अंधेरीतल्या 14 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावल्या नंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. मुंबईतील घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

नाशिक = जोपर्यंत महापालिका आयुक्त प्रवेशद्वारावर येऊन निवेदन स्विकारणार नाही; तोपर्यंत प्रवेशद्वारावर ठिय्या सुरूच राहणार.


मुंबई = युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली कुलगुरूंची भेट. विद्यापाठातील निकाल घोळासंदर्भात घेतली भेट. 5 ऑगस्टलाही निकाल लागणार नसल्याची कुलगुरूंची माहिती.

⁠⁠⁠⁠⁠गाेंदिया = यशवंतपूर टाटानगर सुपरफास्ट रेल्वे गाडीत गार्ड च्या डब्यात साप असल्याची चर्चा. गाेंदिया रेल्वे स्थानकावर पाऊनतास गाडी थांबवली.

मुंबई विद्यापीठातील निकालावर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन,17.5 लाखांपैकी 14 लाख पेपर तपासले, 171 परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याची माहिती.

मुंबई = धनगर आंदोलकांचं आंदोलन. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आंदोलकांचा गोंधळ.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आक्रमक. आयुक्तांच्या दालनात महिला नगरसेविकांचा गोंधळ.

मुंबई = दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली, 7 ऑगस्टला सुनावणीचे हायकोर्टाला निर्देश.

हैदराबाद = अंमली पदार्थांच्या रॅकेट प्रकरणी दाक्षिणात्य अभिनेता आंनद कृष्ण नंदू एसआयटी समोर हजर.

इस्लामाबाद = हाफिज सईदला अजून दोन महिन्यांसाठी घरकैदेत ठेवण्यात येणार. पंजाब प्रांताच्या अधिका-यांनी कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी घेतला निर्णय.

ठाणे = घोडबंदर रोडवरील एका वर्कशॉपमध्ये बॉयलरचा किरकोळ स्फोट. 2 कामगार किरकोळ जखमी.

पीकविम्याचे अर्ज 5 ऑगस्टपर्यत भरता येणार. पीकविम्याला आणखी मुदत मिळण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.

औरंगाबाद = प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण. डोक्याला जबर जखम. प्रमाणपत्र घेण्यास आलेल्यांच्या रांगेचे व्यवस्थापन करत असताना झाली सुरक्षा रक्षकांकडून मारहाण.

मुंबई विद्यापीठा विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचं आज आंदोलन.


हिमाचल प्रदेश = किन्नूर मधील निगुलसरी गावात भूस्खलनाची घटना. एकाचा मृत्यू, दोन जण जखमी झाल्याचे वृत्त.

श्रीनगर = पुलवामा मध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक. लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा.

जयललितांचा पक्ष एनडीए मध्ये सामील होणार - सूत्र

मुंबई = अंधेरीत 45 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या; हत्येप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक.

वर्धा = भरधाव ट्रकनं शाळकरी मुलीला चिरडलं,अपघातात प्रीती घांगळेचा जागीच मृत्यू. पुलगावातील संकटमोचन पेट्रोल पंपजवळील घटना.

अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचे संपर्क संचालक अॅंथनी स्कारामुची यांना पदावरून हटवलं.

No comments:

Post a Comment