तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

9 ऑगस्ट मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा साठी राज्य समन्वय समितीची स्थापना; 210 लोकांची असणार समिती; संभाजी राजे आणि उदयनराजे असणार मुख्य मार्गदर्शक.

विधान परिषदेच कामकाज नियमानुसार चालते पण बहुमताच्या जोरावर दादागिरी करीत गोंधळ घालून मंत्र्यांना बोलू ना देण्याचा प्रयत्न होतोय, म्हणून विधानपरिषदेवर बहिष्कार टाकत आहोत - गिरीश बापट

पुणे = धरणक्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पुणेआणि पिंपरी चिंवड शहराच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटलीआहे. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 24.31 टीएमसी म्हणजेच 83.39 टक्के इतका पाणीसाठा आहे.

लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायलानकारदिला आहे. अबु दुजानाचं पार्थिव ताब्यात घ्यावं यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना संपर्क साधला. मात्र पाकिस्ताननं दुजानचा मृतदेह स्विकारायला नकार दिला. त्यानंतर एकाअज्ञात स्थळी दुजानच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.

पश्चिम बंगाल मधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाही तर राज्यसभेतही होत आहे. राज्यसभेच्या 60 वर्षाच्या इतिहासात पहिली वेळ आहे की बंगाल मधील लेफ्ट पार्टी मधून राज्यसभेत एकहीउमेदवार नाही.

नवी मुंबई = दिघा येथील मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नविन गवते यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रो-कबड्डी - गुजरात विरुद्ध हरियाणाचा सामना 27-27 अशा बरोबरीत सुटला.

मुंबई = 94 वर्षीय दिलीप कुमार लिलावती रुग्णालयात दाखल, मुत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल.

मुंबई = अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोन नौदलाच्या सैनिकांना 15 आणि 12 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

उत्तरप्रदेश = मुजफ्फरपूर मध्ये बस आणि ट्रक यांच्यात अपघात, पाच जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी.

नाशिक = येवला येथील बाजार समितीत कांद्याला मिळाला 1900 रुपये प्रति क्विंटल भाव तर लासलगाव येथे मिळाला 1875 रुपये भाव, या हंगामातील सर्वोच्च भाव.

नाशिक = स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या समितीने नाशिक शहर हगणदारीमुक्त घोषित.

पुणे = पीएमआरडीएच्या हद्दीत महारेरा अंतर्गत 365 प्रकल्पांची नोंदणी.

लातूर = राज्यातील मुली देशभर विकाणाऱ्या 10 जणांना लातूर पोलिसांनी केले अटक, वधू-वर सुचक मेळाव्यातून 300 मुलींची विक्री केल्याचा संशय.

लातूर  शहरालगत कातपूर रोड परिसरातील शंकरपूरम् नगरातील एका दुकानाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या दुचाकी चोरांना अटक.

यवतमाळ = दारव्हा तालुक्यातील हातनी येथे वृद्धाचा दगडाने ठेचून खून, विठ्ठल नारायण गायकवाड (60) असे मृताचे नाव, पैशाच्या वादातून खून झाल्याचा संशय.

रत्नागिरी = पानवल येथे झालेल्या दुचाकी अपघातात तरुण ठार, परेश वामन भाटकर असे मृत तरुणाचे नाव.

नागपूर = सिंचन घोटाळ्यावरील सुनावणी 3 आठवडे तहकूब

No comments:

Post a Comment