तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 3 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

मुंबई =अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर. आयसीयूमधून बाहेर. उद्या पुन्हा काही चाचण्यांसाठी आयसीयू मध्ये दाखल करण्यात येणार.

पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेच्या 1800 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याच्या महापालिकेचा निर्णय.

इयत्ता पाचवी आणि आठवीत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला दुसरी संधी दिली जाणार आहे. मात्र पुनर्परीक्षेतही तो नापास झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात पुन्हा बसवलं जाऊ शकतं.

औरंगाबाद = एटीएम पासवर्ड हेरुन अकाऊण्ट मधील रक्कम लंपास, भामट्याला बेड्या.

चौकशी होईपर्यंत राधेश्याम मोपलवार पदावरुन दूर, मुख्यमंत्र्याचं आश्वासन.

सिंधुदुर्गातल्या आंबोलीत सेल्फीनं नाही, तर दारुनं तरुणांचा जीव घेतला, दारुच्या नशेत स्टंटबाजी जीवावर.

मुंबईसह राज्यातीस रस्त्यांची अवस्था गंभीर.लोकांना खड्डेमुक्त रस्ते देणं सरकारचं कर्तव्य. मुंबई हायकोर्टाचं विधान. आणखी किती जीव जाण्याची वाट पाहत आहात? हायकोर्टाचा सरकारला सवाल.

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड येथील हॉटेल सागरच्या गेटजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला, अरुण साहेबराव गायकवाड असे मृत इसमाचे नाव आहे.

ऑनलाईन पेपर तपासणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दोन आठवडयांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

मुंबई = मोपलवार प्रकरणावरून विधानसभेत आजही गोंधळ, सभागृह तहकूब.

सोलापूर = सिद्धापुर तालुका मंगळवेढा येथीलभीमा नदी पात्रात पोलिसांचा छापा, तब्बल 200 पेक्षा जास्त वाहने ताब्यात.

सोलापूर = यशोधरा हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांचा गोंधळ, चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा अंत, नातेवाईकांचा आरोप.

झारखंड = चारा घोटाळा प्रकरण, रांची येथे सीबीआय कोर्टात आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव सुनावणीसाठी हजर.

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप खासदारांना सूचना.

हिंगोली = स्थानिक गुन्हे शाखेने कळमनुरी दरोड्यातील दोघांना केले जेरबंद, प्रेमसींग खच्ची व राजूसींग बावरी आरोपींची नावे, चोघे अजूनही फरार.

औरंगाबाद = गजानननगर येथील अर्जुन गणेश ढवळणपुरे (वय 26) या युवकाने सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

उत्तर प्रदेश = वाराणसी मध्ये वयोवृद्ध महिला बनवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी राखी.

पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील टीडीसी बँकेच्या सुरक्षा रक्षकाची आज पहाटे हातपाय बांधून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

कोलंबो = भारत विरूद्ध श्रीलंका दुसरी कसोटी; भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. भारत धावा 101/1*

औरंगाबाद = दौलताबाद घाटात दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची मारुती कार पळविणाऱ्या पाच दरोडेखोरांना जिंसी पोलिसांनी पकडले.

वाशिम = शहरातील शुक्रवार पेठेतील राजगुरू गल्लीस्थित विठ्ठल मंदिर परिसरात दोन गटांत वाद, तीन जखमी, बुधवारी रात्री उशिरा घडली घटना.

उत्तर प्रदेश = सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान बनावट नोटा चालवणाऱ्या टोळीतील तीन जणांना केली अटक.

No comments:

Post a Comment