तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

सोशल मिडीयावर महापुरुषांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकुर टाकल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोनपेठ बाजारपेठ बंद ठेऊन निषेध सभा घेण्यात आली.

परभणीत आज मराठा समाजाने भव्य दुचाकी रॅली काढुन मुंबईचा मोर्चा कसा राहील याची एक झलक दाखवुन दिली आहे. अत्यंत शिस्तीत निघालेली रॅली ही परभणीकरांसाठी ऐतीहासीक अशी ठरली आहे. रॅलीच्या निमीत्ताने अवघे शहर भगवेमय झाले होते.

प्रवासा मध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस मध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


कोलंबो कसोटीत पहिल्या डावांत भारताच्या अष्टपैलू खेळाडू आर. अश्विनने दमदारफलंदाजी करताना अर्धशतक ठोकलं. अश्विनेनं 54 धावां करताच कसोटी मध्ये 2000 धावांचा पल्लाही पार केला. सर्वात कमी कसोटी सामन्यात 2000 धावा आणि 275+ विकेट करण्याचा पराक्रम आर. अश्विननं केला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हेडलीच्या नावावर होता.


मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे. सर्व राज्यातील नागरिकांसाठीही सक्ती करण्यात आली असून जम्मू काश्मीर, मेघालय आणि आसामला या निर्णयातून वगळण्यात आलं आहे.

मराठा संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नारायणराव राणेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली भेट.

मुंबई = शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे मित्र - नारायण राणे

मुंबई = शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीवर अभिनंदनाचा प्रस्ताव, विधानसभेत नारायण राणेंनी मांडला प्रस्ताव.


मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्या मराठा संघटनांशी मराठा मोर्चाचा संबंध नाही, सकल मराठा समाज, महाराष्ट्रचे स्पष्टीकरण.

सरकारी नोकरीत पदोन्नतींमधील आरक्षण हायकोर्टाकडून रद्द, 2014 पासूनच्या पदोन्नतीत बदल करण्याचे राज्य सरकारला निर्देश.

यवतमाळ = बाभूळगाव तालुक्यातील उमरी शहीद येथील सैनिक मधुकर केजाजी घोटेकर यांचा जम्मू काश्मीर मध्ये मृत्यू, आजारपणामुळे झाला मृत्यू.

मुंबई = मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणातील सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी 16 ऑगस्टला होणार, पोलिसांकडून सत्र न्यायालयात तपास अहवाल सादर.

नागपूर = शहरात अवैध होर्डिंग लावणारे राजकीय पक्ष, एजेंसी आदींची नावे सांगा, हायकोर्टाचे मनपाला निर्देश.

सांगली = अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी ऐतवडे (ता. वाळवा) येथील तरुणास दहा वर्षे सक्तमजुरी.

दुसरी कसोटी - भारताची सामन्यावर पकड, श्रीलंका दिवसाखेर दोन बाद 50 धावा.

गुजरात = धनेरा येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, भाजपाचं घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य- आर. एस. सुरजेवाला,प्रवक्ते काँग्रेस.

औरंगाबाद = फुलंब्री तहसील कार्यालयात सातबारे जाळून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला पीकविमा भरण्यातील अडचणींचा निषेध.

गुजरातच्या बनासकांठा मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दाखवले काळे झेंडे.

सिंधुदुर्ग = पाच दिवसांपूर्वी आंबोलीतील कावळेसाद दरीत पडलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह वर आणण्यात यश, बीड येथील प्रशांत उजगरे याचा मृतदेह आणला वर, शोधमोहीम थांबवली. सहाव्या दिवशी आंबोली कावळेसादला एनडीआरएफची टीम दाखल होणार.

सिंधुदुर्ग = कणकवली तालुक्यातील वरवडे-फणसवाडी येथे 26 वर्षीय तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू , डायगो फर्नांडिस असे मृत तरुणाचे नाव.

No comments:

Post a Comment