तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 5 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

हिंगोली = नर्सी परिसरातून एक कोटी पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना गौणखनिज उत्खनन व वाहतूक; महसूल विभागाची कारवाई.

सेलू = सध्या राज्यभर मुंबईतील राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच्या जनजागृतीसाठी मराठा समाजातील तरूणी व महिलांच्या नेतृत्वात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

कोल्हापुरातील कवठेसार मध्ये महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. कवठेसार मध्ये दानोळी रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून हातभट्टी दारु अड्डा सुरु होता.संतप्त महिलांनी हा अड्डाच पेटवून दिलाय.

ऑनलाईन माहिती अधिकारातून माहिती मागविण्यासाठी तुम्हाला आता 5 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. याआधी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरताना दहा रुपये भरता येत होते. यापुढे ‘पोर्टल फी’चे पाच रुपये असे मिळून एकूण 15 रुपये आकारण्यात येणार आहेत 26 जानेवारी 2015 रोजीमहाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते.

भारतीय संघातील युवा क्रिकेटर जयंत यादवचे वडील जयसिंह यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वासघेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रासही होता.

कोलंबो = भारत वि श्रीलंका दुसरी कसोटी, श्रीलंकेचा संघ 183 धावांवर बाद. भारताकडे 439 धावांची आघाडी.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धोकादायक स्थितीत असलेल्या देशातील शंभरहून अधिक पुलांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 14 पुलांचा समावेश आहे.

खोटी आश्वासनं देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली तरी चूक ठरणार नाही, असं वक्तव्य जगनमोहन रेड्डी यांंनी केले आहे.

नवी मुंबई = कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात गायक मिका सिंगचा पुतळा जाळून मनसेची निदर्शनं, 'हमारा पाकिस्तान' कार्यक्रमातील सहभागाचा निषेध.

जम्मू काश्मीर = सोपोर मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा एन्काऊंटर.

सावंतवाडी = आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दुसर्या युवकांचा मृतदेह सापडला. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू.

हिंगोली = वसमत बाजार समितीच्या अविश्वास ठराव सभेने तणाव, संचालक मंडळ घेऊन येणा-या जीपवर दगडफेक.

उपराष्ट्रपती पद निवडणूक : मतदानासाठी खासदार आणि बॉक्सिंगपटू मेरी कोमने लावली हजेरी.

दौंड मध्ये पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यू. मोकाट कुत्र्यांकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप.

कऱ्हाड = माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे थोरले बंधू व गोवा मुक्ती संग्राम चळवळीतील नेते भाई कॉम्रेड पंजाबराव चव्हाण ( वय 90 ) यांचे निधन. पुणे येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.

उपराष्ट्रपती पद निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान.

उपराष्ट्रपती पद निवडणूक : मी सर्व सदस्यांना ओळखतो आणि ते देखील मला ओळखतात. यामुळे मी प्रचार देखील केला नाही. - व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपतीपद निवडणूक : बहुतांश नेत्यांनी मलापाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे - व्यंकय्या नायडू.

वणी (नाशिक) = ओझरखेड धरण परिसरातील शेळकेवाडीतील एका झोपडीत मायलेकाचे मृतदेह आढळला संशयास्पद परिस्थितीत. हत्या झाल्याची प्राथमिक माहिती.

No comments:

Post a Comment