तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

'गाव करेल ते राव काय करेल' या उक्तीची प्रचिती सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच नऊ किलोमीटर अंतरावर वसलेल्या लालठाणे गावात आली असून मंगळवारी ( ता.15) झालेल्या ग्राम सभेत गावाने दारू बंदीचा निर्णय घेतला आहे.

येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा कालचा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला.

छत्तीसगड मधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

2018 ची निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणार - अमित शाह.

ना बंदूक, ना युद्ध....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव.

नागपूर = भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे हृदयविकाराने निधन.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची चळवळ उभी केली - उद्धव ठाकरे.

शिवसेनेचं अस्तित्व आधी सर्वांनी डावललं - उद्धव ठाकरे.


उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 30 हून अधिक प्रवासी जखमी.

जुन्नर बार असोसिएशनचे माजी खजिनदार व विद्यमान सदस्य अॅड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचा डेंग्यूमुळे मृत्यू.

पिंपरी चिंचवड = शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, रहाटनी येथील घटना.

सिंधुदुर्ग = गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 10 ठिकाणी मिनी कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक गेडाम यांची माहिती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या फेर परीक्षेचा ऑनलाइन निकाल 21 ऑगस्टला होणार जाहीर.

नंदुरबार मध्ये आठ वर्षीय चिमुरडीला बसने चिरडलं, अंकलेश्वर - ब-हाणपूर हायवेवरील घटना, संतप्त जमावाने टायर पेटवत रोखून धरला हायवे.

राजस्थान मधील चित्तोडगड येथे दोघांना पोलिसांकडून अटक, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील व्यवसायिकाचा समावेश, 8 लाखांच्या जुन्या नोटा केल्या जप्त.

गोंदिया = शारीरिक संबंध करताना पाहणा-या मुलाला विष पाजून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना.

कोल्हापूर = विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरण, आरोपी शिक्षक विजय मानगुडेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

मुंबई = माझगाव परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांना एमडीची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला अटक, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त गोरखपूर जिल्ह्याला दिली भेट.

जदयू मध्ये कुठलीही फाटाफूट नाही, विधानसभेतील 71, विधानपरिषदेतील 30 आमदार आणि सर्व पदाधिकारी नितीश कुमारांसोबत - जदयू नेते केसी त्यागी यांची पाटण्यामध्ये माहिती.

डोंबिवली = भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना मानपाडा पोलिसांनी अटक व सुटका . खोणी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सरपंचाला धमकावल्याच्या प्रकरणामुळे केली होती अटक.

कृषी कर्जमाफी योजनेत शेतक-यांकडून लाच मागणा-या महसूल विभागाच्या पाच कर्मचा-यांना उत्तरप्रदेश सरकारने केले निलंबित.

लुधियाना सिटी सेंटर घोटाळा प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासह इतर आरोपींना क्लिन चीट.

सोलापूर = बेपत्ता इसमांचा खून, सहा जणांवर गुन्हा दाखल, धर्मगावातील घटना़.

नाशिक = घरपट्टी आणि पाणी पट्टी वाढविल्याने नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळविण्याचा प्रयत्न.

मध्य प्रदेश = कटनी येथून 2 लाख 48 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटांसह, छपाई मशीन हस्तगत, तीन जण अटकेत.

कोल्हापूर = राजारामपूरी पोलीस ठाण्यातील पोलीस काॅन्स्टेबल किरण गवळी लाच घेताना अटक.

वाशिम = रिसोड मार्गावर पॉलिटेक्निक कॉलेज जवळ आईची चारवर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मनोरजवळ अपघात. कंटनेर कारचा भीषण अपघात. तिघांचा मृत्यू. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात.

No comments:

Post a Comment