तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

मुंबई = भांडूपच्या नरदास नगरमध्ये रवींद्र कदम या व्यक्तीची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धर्मा पाटील, दीपक दुर्गा राजपूत, रोशन सिंग हे वारंवार पैशासाठी धमकावत असल्याची नावे.

आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणा नंतर टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक मोठे डील, टाटांचा तोट्यातला टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी मुकेश अंबानी यांच्याशी चर्चेचे वृत्त.

पुणे = या वीकेण्डला तुमचा सिंहगडावर जाण्याचा प्लॅन असेल, तर तो तुम्हाला रद्दकरावा लागणार आहे, कारण सिंहगड रस्ता आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलाय.

नवी दिल्ली = कर्नाटकचे मंत्री डी. के. शीवकुमार यांच्या मालमत्तांवरील आयकर विभागाचा पुन्हा छापा, सफदरजंग येथील घरावर सकाळी छापा.

बोरिवली पोलिसांनी दरोड्याच्या एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे, हिरे चोरीचाकेला होता बनाव.

दिलीप कुमार आयसीयू मध्ये, किडनी निकामी झाल्याने उपचार.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ’20 ब’मधील भाजप उमेदवार नयना वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर रात्री एक वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज बाद ठरवला.

काँग्रेसला मागे टाकत भाजप राज्यसभेत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे राज्यसभेत 58 खासदार झाले असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या 57 वर गेली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काँग्रेसचं वर्चस्व मोडित, राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष.

आंबोलीतील दरीत पडलेल्या दोघांच्या मृतदेहाची शोध मोहीम कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीने थांबवली, प्रशासनाची मदत मिळत नसल्याने निर्णय.

पीकविमा भरण्यासाठी आज शेवटची मुदत, बँक व तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या रांगा.

लखनौ = मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यात स्वच्छता मोहीमेची सुरुवात. अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री भूमि पेडणेकर देखील होते हजर.

मालवण समुद्रात आज सकाळी नौका उलटली, पाचही मच्छीमारांना वाचवण्यात यश.

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा 6 ऑगस्ट पासून संपाचा एल्गार.

मुंबईत हिट अँड रनची घटना, घटनेत एकाचा मृत्यू. मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाता विरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल.

दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ठार.

जळगाव = वाकोद (ता. जामनेर) येथे घरगुती गॅसचा भडका होऊन त्यात दोन महिलांचा मृत्यू.

रायगड = आंबेनळी घाटात दरड कोसळली, पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग ठप्प, महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक ठप्प.

नवी दिल्ली = विरोधी पक्ष परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विरोधात राज्यसभेत आणणार दोन विशेषाधिकार प्रस्ताव.

मेलबर्न = क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटपटूंमधील तिढा सुटला, क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंना देणार 50 कोटी डॉलर.

No comments:

Post a Comment