तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 September 2017

पो.नि उदयसिंह चंदेल यानी पकडली चोरटी होणारी अवैध दारू

वसमत : रामु चव्हाण

वसमत शहर पोलिसांनी चोरटी  दारु विक्री करणा-या विरुद्ध कार्यवाही करत 28000 रुपयांची दारु पकडली आहे 
   वसमत शहरात एका घरात अवैध दारू विक्री होत असल्या बाबत मिळालेल्या  गोपनीय महितीवरुन पो.नि.उदयसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि सय्यद आजम,पोहेका राजु सिद्दीकी,शंकर हेन्द्रे,वाघमारे,केंद्रे,हलीमा शेख आदिच्या पथकाने  दि 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता वसमत येथील रेल्वे स्थानक जवळील रतनसिंग चतुर सिंग चव्हाण यांच्या घरा समोर विना परवाना चोरटी विक्री करण्या च्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या देशी दारु जॅकपॉट व देशी दारु संत्रा,टैंगो पंच,च्या एकूण 467 बाटल्या 28000 रुपय किमतीची दारु जप्त करुण या प्रकरणी सपोनि सय्यद आजम यांच्या फिर्यादि वरुण रतनसिंग चतुर सिंग चव्हाण यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये वसमत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सपोनि सय्यद आझम यांच्या पथकाने  28 हजार  रुपयांची दारु पकडली आहे दोन दिवसात दोन धाडसी कार्यवह्याने अवैध दारु विक्रेत्याची चिंता वाढवली असुन पोलीस विभागाच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन  होत आहे प्रकरणाचा पुढील तपास पो.ना शेख जावीद हे करीत आहे

छाया - नंदु परदेशी, श्रीधर वाळवंटे, नागेश चव्हाण

आजचे राशीभविष्य, रविवार, ०१ ऑक्टोबर २०१७

आजचे बारा राशींचे राशीभविष्य
मेष
ॐ गणेश्वराय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यवसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी
वृषभ
ॐ शंकराय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
ॐ महादेवाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतिची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यवसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी
कर्क
आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – गुलाबी
सिंह
ॐ विठ्‌ठलाय नमः हा मंत्र आज म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा
कन्या
ॐ प्रभंजनाय नमः या मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – निळा
तुळ
ॐ तेजस्विनैय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – आकाशी
वृश्चिक
ॐ चिद्‌रत्नाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पिवळा
धनु
ॐ चिद्‌प्रशांताय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यवसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा
मकर
ॐ विघ्ननाशकाय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
ॐ सुदनवाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग- नारंगी
मीन
ॐ त्रिलोकेशाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – गडद लाल
 

भोकरदन येथे आज भव्य रावण दहनाचा कार्यक्रमाचे आयोजन...


    प्रतिनिधी :  भोकरदन

   भोकरदन शहरात आज शनिवार रोजी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन ,हा भव्य कार्यक्रम नगर परिषद मैदान भोकरदन येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्खेने उपस्थित राहावे अशे आयोजन समितीचे प्रतिक देशमुख,तुषार पाटील,सचिन शास्ञी,रोशन देशमुख,रूषिकेश पगारे,सागर हिवरकर,रमेश जाधव,गौरव जैन अदिंच्या वतीने कळविण्यात आले आहे.

     ════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप :
9637599472 ...
                          ╰════════════

संरपंच बिनविरोध निवडीसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे

आभार - नरहारे
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ (इ)  येथिल अविश्वास ठरावानंतर गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य ते सहकार्य केले त्याबद्दल राजेश दादा विटेकर व इतर सर्वांचे आभार गं. भा. शांताबाई रामभाऊ नरहारे यांनी व्यक्त केले. तसेच विजया दशमीच्या मुहूर्तावर हा विजय मिळाला असून यामध्ये चांगले घडण्याचे नैसर्गिक संकेत असावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डिघोळ येथिल संरपचावर 9/4 असा अविश्वास ठराव पारित करुन दोन महिने पुर्ण झाले होते, तेव्हा पासुन डिघोळचे सरपंच पद हे रिक्त होते.  काल दि. 29/09/2017 रोजी शुक्रवारी निवडणुक आधिकारी तसेच ग्रामविस्तार अधिकारी यांच्या समक्ष सौ.अर्चना विजयकुमार चव्हाण यांची विरोधक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे बिनविरोध अशी निवड करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्य, गावातील सर्व नागरिक, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार शांताबाई रामभाऊ नरहारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.  याप्रसंगी सदस्य मैनाबाई भगवान शिंदे, कोंडीबा काळभार ,रुकसणा जावेद शेख ,गोकुळ आरबाड, सुनिल खंदारे , गजराबाई गोपीनाथ गायकवाड,मालनबाई राठोड,आदिंसह सर्व सदस्य तसेच माजी पं.स.सदस्य उत्तमराव शिंदे , माजी सभापती छायाताई शिंगाडे ,माजी पं.स.सदस्य विनोद गायकवाड ,माजी सरपंच राम पारेकर वाल्मीक शिंदे, सचिन जगदाळे, लहू सुरवसे, गणेश पारेकर,सचिन ढगे, राज टाले, श्रीराम जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दशर्याच्या मुहर्तावर कापसाला ४ हजार शंबर रूपये मिळाला भाव...

   प्रतिनिधी :  सोयगाव देवी

      भोकरदन तालुक्यातील अनेक व्यापार्यांनी दशर्याच्या शुभ मुहर्ते साधुन कापुस खरेदीला सुरवात केली असुन , कापसाला ३ हजार आठशे ते चार हजार शंभर रूपये  किंटल प्रमाणे शेतकर्यांकडुन व्यापार्यांनी खरेदी केला.
   मागील वर्षाच्या तुलनेत कापसाला मिळालेला हा भाव खुपच कमी असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.मागिल वर्षी कापसाला ४ हजार पाचशे रूपयापासुन ते ५ हजार सातशे रूयापर्यंत भाव मिळाला होता.यंदा कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती पण सुरवातीलाच कमी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसुन येत आहे.
   भोकरदन तालुक्यातील दानापुर,सोयगाव देवी,केदारखेडा,सिपोरा बाजार,हसनाबाद,तसेच अनेक छोट्या मोठ्या गावातील व्यापार्यांनी कापुस खरेदीला सुरवात केली आहे.

फोटो ओळी :  भोकरदन येथे कापुस खरेदी काट्याचे उद्दघाटन करतांनी जिल्हा परिषद सदस्य डाॅ.चंद्रकांत साबळे,भाजपाचे शहर अध्यक्ष सतिष रोकडे,रमेश पांडे,शिवा सोनवणे,पप्पु शेट,टि.के.सोनवणे,व शेतकरी दिसत आहे.

     ════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप :
9637599472 ...
                          ╰════════════╯

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही : राज ठाकरे

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुरक्षित आणि सुखकर होत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणी सरकारवर जोरदार निशाणा साधला.“इथे लोकांचं चालणं कठीण झालंय,

तर बुलेट ट्रेन कशाला हवी?

मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरात मध्ये करावी. जबरदस्ती केली तर ती आमच्या कडूनही होईल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं हे मला अजूनही समजलं नाही, असं म्हणत बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभूंना हटवून गोयल यांना आणल्याची टीका राज यांनी पत्रकार परिषदेत केली. तसंच मोदीं इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिला नाही, असंही ते म्हणाले.

…म्हणून घटनास्थळी गेलो नाही“ एलफिन्स्टनवरची घटना अतिशय दुर्दैवी होती. पण व्यवस्था, यंत्रणेवर ताण येऊ म्हणून काल घटनास्थळी गेलो नाही. चिंतेचा आव आणून त्या गोष्टी पाहण्यात अर्थ नसतो. संजय गवते 10 ते 15 वर्ष एलफिन्स्टन पुलासाठी भांडत आहेत. तर बाळा नांदगावकरांनीही अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला आहे. परंतु एवढ्या वर्षात काहीही झालेलं नाही,” असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही, चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना उत्तर

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्या शिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय, ते त्यांनी ठरवावं, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला चर्चगेटला रेल्वेच्या कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले. शिवाय, त्यांनी रेल्वेमंत्र्यांसह भाजपवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांना काय करायचंय.”, शिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदारा विरोधातच

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

गोव्यातील फातोर्डा मतदार संघातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पोलिस स्थानकाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार तथा मंत्री विजय सरदेसाई उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे, या नव्या पोलिस स्थानकातील पहिली वहिली तक्रार स्थानिक आमदार सरदेसाई यांच्या विरोधात सादर करण्यात आली आहे.वेर्णा येथील औद्योगिक वसाहती मधील खुल्या जागेचे रुपांतर औद्योगिक भूखंडांत केल्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी काशिनाथ शेट्ये यांना धमकी दिल्याचा दावा करत, स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांच्या विरोधातच आयरिश रॉड्रिग्स यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसंदर्भातील दृकश्राव्य पुरावे सादर केल्याचा दावा रॉड्रिग्स यांनी केला.


जिंतुरात सा बां रस्त्यावरिल खड्डयांना क्लास 1मुलामा


प्रदिप कोकडवार
जिंतूर
शासनाचे लाखो रुपयांचे निकृष्ठ काम करून जिंतूर सा बांधकाम खात्यातून लग्गेबाजी न रक्कम उचलून आपले उखळ पांढरे करून घेऊन जिंतूर च्या रहदारीच्या मुख्य रसर्त्यावर वर्ष पण पूर्ण न झालेल्या रसत्यावर   खड्डेच खड्डे पडलेत  परिणामी पादचारी वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागत आहे या बाबत वृत्त प्रसिद्ध होताच आणि सोशल मिडिया वर ओरड होत असल्याने  दुर्गामहोत्सव  
या पवित्र महोत्सवातील  भक्तांचा नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता जिंतूर येथील पदसिद्ध क्लास 1सार्वजनिक बांधकाम अधिकाऱयांनी या रस्त्यावर चक्क मुरूम टाकून धूळ मुक्त झालेल्या रसत्याला धुळी च्या हवाली करून  नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार केला आहे
या बाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की सार्वजनिक बांधकाम खात्यात जिंतूर उपविभागात अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम केलेले अभियंता किशोर सोनार यांच्या भावा च्या गुत्तेदार एजन्सी ने हे काम नुकतेच पूर्ण केले होते काम पूर्ण होताच तिन महिन्यात अनेक खड्डे पडले व ते त्यांनी बिल अडकल्या मुळे बुजवले पण परंतु आता परत उलट्या नदीवरील पुलावर आणि त्यांच्या पुढे पुन्हा खड्डे पडलेत या मुळे आता परत प्रवासी त्रस्त आहेत तर पादचारी खड्ड्यात पडू नये म्हणून कसरत करत आहेत
या सर्व परिस्थिती ला कोण जबाबदार असा प्रश्न न विचारता रस्त्याची दगडुगी ची पूर्ण जबाबदारी असतानाही त्यांचे कडून खड्डे न बुजवता धूळच धूळ  करून मुरुमाचा मुलामा देणे कित पत योग्य आहे  असा प्रश्न जिंतूरकर विचारल्या शिवाय राहणार नाहित हे मात्र खरे

भोकरदन शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.


   भोकरदन (प्रतिनिधि) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह नागपुर मुक्कामी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हापासून अशोका विजायादशमि दिनी देशभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणुन बुद्ध बांधव मोठया उत्साहात साजरे करतात.
    दरम्यान भोकरदन शहरात सकाळी रमाई नगर ,नवे भोकरदन भागातील अशोक बुद्ध विहारात प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ नीळ्या ध्वजाचे ध्वजारोहन व डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यात आले.तसेच सिल्लोड कॉर्नर वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ ही निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येवून साहमुहिक बुद्ध वंदना व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.
      यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शामराव दांडगे,नगरसेवक दिपक बोर्ड,नागसेविका निर्मलाताई भिसे,माजी नगरध्यक्ष चंद्रकांत पगारे,डॉ.बाबासाहेब अंबेडकर स्मारक समितीचे सचिन पारखे,अन्याय प्रतिकारदलाचे भोकरदन ता.अध्यक्ष प्रदिप जोगदंडे,प्रा.सोनकंबळे,प्रा.खरात,प्रा.नरवडे,प्रा.अशोक नवगिरे,शृंगारे,भारत रगडे,खंडागळे,सुरेश पैठने,मिलिंद तायडे,रवि मोरे,भीमराव भिसे,भारत हिवाळे,पत्रकार सुरेश बनकर,कमलकिशोर जोगदंडे यांच्या सह बौद्ध बांधव व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
     तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

पिरामिड स्कूलमध्ये दांडियाची धमाल


वसमत /रामु चव्हाण

लहान मुलांचे कलागुणांना वाव देनियासाठी नवरात्री निम्मित बचपन-पिरामिड स्कुल तर्फे व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला.

दांडिया महोत्सवात विद्याथ्यांसह शहरातील पालक, महिला,युवक-युवती,वयोवर्ध मोठीया प्रमाणात सहभागी झाले. सदरील महोत्सवात दांडिया स्पर्धा, कपल राउंड व कॉमन राउंड घेण्यात आले.सर्वांनी दांडिया खेळून मन-मुराद आनंद लुटला.शहरातील डॉक्टर्स, वकील, इंगीनिर्स, व्यापारी सहभागी झाले होते. कपल राउंड मध्ये मिस्टर-मिसेस यांची जुगलबंदी पहानिया सारखी होती.

दांडिया फेस्टिवल मध्ये प्रथम क्रमांक नवदुर्गा ग्रुप , द्वितीय क्रमांक झंजरिया ग्रुप तर तृतीय क्रमांक माँ दुर्गा ग्रुप यांनी पटकावला.

यावेळी बचपन-पिरामिड स्चूल चे संचालक प्रा.एफ.एफ.कच्छी यांनी आपल्या जीवनात संस्कृती चे महत्त्व व त्याची गरज यावर मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमासाठी अधियक्ष स्थानी अफरोज  कच्छी मैडम,प्रमुख पाहुणे कमल पाटील आणि परीक्षक कवयत्री जयश्री पाटील , उज्जवला तोलमारे उप्स्तीथ होत्या.

कार्यक्रम यस्स्वितेसाठी शाळेच्या कौंसलर प्रीती मैडम,पिआरो सुकेसनी मैडम व सर्व शिक्षक-शिक्षीका,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

छाया - नागेश चव्हाण

Friday, 29 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

महिन्यातील शेवटच्या दिवशी सुकर्म आणि ग्रहण योग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी-बिझनेसमध्ये फायदा होईल. तणावमुक्त व्हाल. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीही दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर 4 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष - महत्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावण्याची गरज आहे. कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. कामाच्या व्यापात मानसिक स्वास्थ्य हरवून बसाल. शुभ रंग : हिरवा, अंक-२.

वृषभ - आज नोकरीच्या ठीकाणी फक्त आपल्या वाटयाचे काम करावे. जास्त खोलात शिरल्याने अडचणी वाढून कामाचा व्याप वाढेल. तब्येत सांभाळा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-3.

मिथुन - उद्योगधंद्यात मंदी राहील. शािररीक थकवा जाणवेल. क्षुल्लक कारणाने जोडीदाराशी मतभेद राहतील. मोठे आर्थिक व्यवहार टाळलेत तर बरे होईल. शुभ रंग : तपकिरी, अंक-९.

कर्क - एखादा विवाह जमवण्यात मध्यस्ती कराल. शब्दाला वजन राहील. गृहीणी पतीराजांनी केलेल्या स्तुतीने सुखावतील. लांबचा प्रवास कंटाळवाणा होईल. शुभ रंग : नारिंगी, अंक-८.

सिंह - नोकरीत जास्तवेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. वरीष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या नादात प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होईल. सतर्क रहा. शुभ रंग : पिस्ता, अंक-५.

कन्या - कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागल्याने निर्धास्त असाल. आज स्वत:साठी वेळ काढू शकाल. हौसमौज करण्याकडे कल राहील. स्वप्नात रमाल. शुभ रंग : निळा, अंक-1.

तूळ - आवक बऱ्यापैकी असली तरी योग्य आर्थिक नियोजनही गरजेचे आहे. तरुणांनी मर्यादा पाळाव्यात. गृहीणी आंदाने पाहुण्यांची उठबस करावी करतील. शुभ रंग : गुलाबी, अंक-१.

वृश्चिक - कौटुंबिक जबबदाऱ्या पार पाडण्यासाठी धावपळ वाढेल. भावंडांस मदत करावी लागेल. जाहीरात एजन्सीज् व फोटोग्राफी व्यवसाय तेजीत चालतील. शुभ रंग : राखाडी, अंक-८.

धनू - आर्थिक चिंता मिटणार आहेत. सुखवस्तु चैनीकडे ओढा राहील. मनासारखी चैन करता येईल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील. मस्त दिवस. शुभ रंग : क्रिम, अंक-6.

मकर - किरकोळ दुकानदारांची चांगली कमाई होईल. आज व्यवसायात भगिदारांचे सल्ले विचारात घ्यावे लागतील. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. शुभ रंग : गुलाबी, अंक-2.

कुंभ - वैवाहीक जिवनात उगीचच कारण नसताना जूनी भांडणे उकरुन काढू नका. जे चाललंय ते बरं चाललंय असे धोरण ठेवा. प्रवासात सावध रहा. शुभ रंग : पिवळा, अंक-४.

मीन - कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. एखादा वास्तूविषयक व्यवहार तुमच्या फायद्याचाच होईल. एखादा अकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : तांबडा, अंक-3.

रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षांनी केला पत्रकारांचा सत्कार.


माहूर (प्रतिनिधी )श्री रेणुकादेवी संस्थानने भाविकांसाठी केलेल्या सुख सुविधा,नवरात्र उत्सवात केलेले  धार्मिक विधी व घेतलेल्या विविध कार्यक्रमाची आपल्या वृत्तपत्रात सर्व दूरपर्यंत केलेली यथायोग्य प्रसिध्दी देवून केलेली मातेची सेवा ही प्रशंसनीय बाब असल्याचे उदगार    अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश सुधीर कुळकर्णी यांनी पत्रकारांचा सत्कार करतांना काढले.
           अष्टमीला सायंकाळी सहा वाजता  संस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश सुधीर कुळकर्णी यांनी संस्थानचे वतीने  बहूभाषिक  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,उपाध्यक्ष जीतु चोले,सचिव राजू दराडे यांचे सह गजानन भारती,नितेश बनसोड,इलियास बावाणी राजठाकूर, कार्तिक बेहरे, जितेश जाधव , जयकूमार अडकिने,अविनाश टनमने,   आदि पत्रकारांचा मातेचा  प्रसाद देवून येथोचीत सत्कार केला.आज  अष्टमी   असल्याने परंपरेनुसार  रात्री अध्यक्ष तथा  जिल्हा सत्र न्यायाधिश सूधिर कूलकर्णी  पुजारी भवानीदास भोपी,प्रशांत भोपी यांचे हस्ते  होम हवन विधी संपन्न झाला.या विधीचे पौरोहित्य वे.शा.सं.विजय शास्त्री कोरटकर,चंद्रकांत रिठे,अनिल काणणव,श्रीपाद जगत यांनी केले.या वेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,विनायक फांदाडे, आशीष जोशी,समीर भोपी व श्रीपाद भोपी यांची उपस्थिती होती.