तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

अपंगांच्या 3%निधी तात्काळ खर्च करा -- प्रहार

संपत रोडगे
गंगापुर:- तालुक्यातील ग्रामपंचायतीनीअपंगांचा 3%निधी तात्काळ खर्च कराया मागणीसाठी मा,गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर येथे प्रहार टीम गेली असता तेथे कोणताही जवाबदार अधिकारी उपस्तीत नव्हता म्हणून पंचायत समितीचे शिपाई यांच्याकडे निवेदन देऊन प्रशासनाचा गलथान कारभाराचा निषेध केला.
३% निधी खर्च करण्यासंदर्भात मा,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद औरंगाबाद यांचे आदेश असतांना तालुक्यातील ग्रामपंचायतीने 30ऑगस्ट रोजी विशेष ग्राम सभा बोलून निधी खर्च करणे आवश्यक असतांना ग्रामपंचायत ने  आदेशाची पायमल्ली केली म्हणून गटविकास अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अहवाल 14 सप्टेंबर पर्यंत प्रहार पक्ष्याने मागितला 18सप्टेंबर पर्यंत निधी खर्च न केल्यास मा ,बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार स्टाईल ने आंदोलन छेडण्यात येईल आसा ईशारा देण्यात आला. हे तसेच ३% खर्चाचे निवेदन पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांना हि देण्यात आले.
निवेदनावर ता प्रमुख भाऊसाहेब शेळके पाटील,जिल्हा प्रमुख संजय चव्हाण ,जिल्हा संपर्क प्रमुख राऊफ पटेल जिल्हा युवा आघाडी प्रमुख कल्याण जाधव,गंगापूर शहर अध्यक्ष ज्ञानदेव काळे पाटील ,ता उप प्रमुख बाबासाहेब खंडागळे,संभाजी गावंडे ,राजेंद्र गावंडे, ता सचिव राहुल पारखे,बाबासाहेब कान्हे,संतोष डोंगरे,अपंग क्रांतीचे शहर अध्यक्ष रमेश खर्डे,व इतर प्रहार सैनिकांच्या सवक्षऱ्या आहेत

No comments:

Post a Comment