तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 13 September 2017

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज.


_________________________

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाख 51 हजार 748 अर्ज कृषी आयुक्तालयाकडे आले असून, यातील सर्वाधिक अर्ज हे बीड जिल्ह्यातून आले आहेत. राज्याच्या कृषी आयुक्तलयाने जून महिन्यापासून 2017 साठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान पीक विमायोजना’ राबवण्यास सुरुवात केली. 2017 च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2017 पर्यंत या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहनही कृषी आयुक्तलाय कडून करण्यात आले होतं. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, राज्यातील अहमदनगर सोडता इतर सर्व जिल्ह्यातून 67 लाख 51 हजार 748 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्वाधिक अर्ज हे बीड जिल्ह्यातून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.बीड जिल्ह्यातून जवळपास 11 लाख 68 हजार 359 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातील 9 लाख 64 हजार 302 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. तर सर्वात कमी कोल्हापूर जिल्ह्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 416 शेतकऱ्यांनीच पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. प्रादेशिक आकडेवारी नुसार, एकट्या मराठवाड्यातील 83 टक्के म्हणजे, 56 लाख 4 हजार 22 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.

No comments:

Post a Comment