तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले सुभाषराव सावंत भरले 89 कर्ज माफीचे अर्ज


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले असताना त्यांचे फॉर्म भरण्यासाठी भाजप तालुका उपाध्यक्ष सुभाषराव सावंत यांनी त्यांच्या रहात्या ठिकाणी जाऊन अर्ज भरून दिले.
आनंदनगर वसाहत येथील 'छत्रपती शिवाजी महाराज' कर्ज माफी योजने अंतर्गत मा.'मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस' यांनी जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेचा लाभ हा सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळावा. या हेतूने या योजनेपासून शेतकरी वंचीत राहू नयेत या उद्देशाने 'आनंदनगर वसाहत' बोदंंरगाव  येथील कर्ज माफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांचे के सी सी नंबर व पुनःर्गठित कर्जाचे 'KCC' नंबर SBI शाखा सोनपेठचे 'शाखाधिकारी' श्री.शेळके साहेब यांच्या कडून उपलब्ध करून  कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या 89 शेतकऱ्यांचे 'ऑनलाईन पद्धतीने' अर्ज भरून दिले. वसाहत मध्ये व बोदंरगाव,वंजारवाडी तांडा,बेलंबा,थडी उक्कडगाव, धामोनी इत्यादी गावात जाऊन शेकडो फॉर्म रीतसर पूर्णपणे भरून घेतले.
           या कामी त्यांना 'स्माईल कॉम्पुटर' चे 'संचालक' श्री. आसारामजी काळे व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर सावंत,मोतीराम काळे या 'ऑपरेटरने' बहुमोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment