Breaking News
Loading...

Wednesday, 6 September 2017

माता-भगिनींवर वाईट नजर टाकाल तर बुलडोझर फिरवू : योगी आदित्यनाथ


_________________________

माता-भगिनींवर वाईट नजर टाकाल तर घरावर बुलडोझर फिरवला जाईल,अशा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. अलाहाबाद मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशच्या 22 कोटी जनतेला सुरक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं. व्यापारी, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, माता-भगिनींवर वाईट नजर टाकली किंवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला जाईल, असंही ते म्हणाले.“राज्यातील बिघडलेली कायदा-सुवस्था सुधारण्यासाठी काम सुरु आहे. वारसा हक्कात 15 वर्षांपासून बिघडलेली कायदा-सुव्यवस्था मिळाली आहे, ती सुधारण्यासाठी काही काळ लागेल,” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

No comments:

Post a Comment