तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांचा आजरोड शो, शिंजो आबेंचा भारत दौरा.

_________________________

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिवस ते गुजरात मध्येच राहणार आहेत. मोदी आणिआबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. भारत-चीन डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर आबे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. गेल्या 3 वर्षांत मोदी आणि आबे यांनी 10 वेळा एकमेकांची भेट घेतली आहे.

शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहराला नवरीसारखं नटवण्यात आलं आहे. रात्री साबरमती नदीकिनारा तिरंग्याच्या झगमगाटात पाहायला मिळाला.नदी किनारी भारत-जपान मैत्री दाखवण्यासाठी दोन्ही देशांचे झेंडे मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले. केवळ साबरमती नदीच नव्हे तर संपूर्ण अहमदाबाद शहर रंग-बिरंगी प्रकाशाने लखलखून गेलं आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दुपारी साडेतीनच्या सुमारास अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल होतील. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतील. इथूनच मोदी आणि आबे यांच्या ऐतिहासिक रोड शोला सुरुवात होईल. दोन देशांचे पंतप्रधान रोड शो करण्याची ही जगातील कदाचित पहिली घटना असेल. 8 किमी रोड शोदरम्यान भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात येईल.

मोदी आणि आबे यांच्या रोडशोदरम्यान 28 छोटे छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. इथे 28 राज्यांचे कलाकार पारंपारिक वेशभूषेत आपल्या कला सादरकरतील.रोड शोचा शेवट साबरमती आश्रमा जवळ होईल. संध्याकाळी साडेचार वाजता मोदी आणि आबे हे साबरमती आश्रमाला भेट देतील, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. यानंतर ते सिद्दी सैय्यद मस्जिदीला भेट देतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी शिंजो आबे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं उद्घाटन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment