तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

वडवणी नगर पंचायतीने विकासातुन राज्याचे लक्ष वेधले - विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर

वडवणी नगर पंचायतीला राज्यस्तरीय "सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार २०१७" प्रदान

   राहुल गायसमुद्रे /प्रतिनिधी
वडवणी दि.१३  वडवणी नगर पंचायतच्या माध्यमातून शहराचा कायापालट होवून सर्वांगीण विकासाचे वडवणीकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. वडवणीच्या विकासाची यशोगाथा राज्यस्तरावर जावून पोहचली असुन समस्त वडवणीकरांची छाती अभिमानाने फुलून येईल असा क्षण नगर पंचायतच्या माध्यमातून घडून आला असुन अहमदनगर येथिल सह्याद्री उद्योग समुहाच्या वतीने परवा दि.१० सप्टेंबर रोजी वडवणी नगर पंचायतचा 'सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार २०१७' या पुरस्काराने गौरव करुन सन्मानित करण्यात आले आहे. राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीतांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. मंगलताई मुंडे व त्यांच्या समुहाने हा पुरस्कार स्विकारला.
                             याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथिल नगर पंचायतच्या माध्यमातून शहरात विविध कोट्यावधी रुपयांचे विकासकामे मार्गी लावत शहराला संपूर्ण महाराष्ट्रात एक ऑयडाॅल म्हणुन नावारुपाला आणलेले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या कर्तृत्ववान पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे व आ.आर.टी.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. मंगलताई मुंडे व सर्व नगरसेवक आणि नगर पंचायत प्रशासनाची कौतुकास्पद वाटचाल सुरु आहे.  वडवणी नगर पंचायत सातत्याने विकासात्मक उत्तुंग गरुडझेप घेत आहे.  वडवणीत नगर पंचायतीची निर्मीती झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी  पार पडलेल्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपा पदाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनांची जलद पुर्तता आणि कोट्यावधी रुपयांचे विकासकामे मार्गी लावत शहर व शहरवासियांचा केलेला सर्वांगीण विकास याच उत्कृष्ट कार्याबध्दल त्यांच्या या कामाची दखल घेत राज्यात नावाजलेल्या अहमदनगर येथिल सह्याद्री उद्योग समुहाच्या वतीने परवा दि.१० सप्टेंबर रोजी वडवणी नगर पंचायतचा 'सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार २०१७' या पुरस्काराने गौरव करुन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर, जलसंधारण मंञी ना. प्रा.राम शिंदे,  माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप, आ.शिवाजीराव कर्डीले, जेष्ठ साहित्यीक संजय कळमरकर, दै.लोकमत अहमदनगर आवृत्ती संपादक सुधीर लंके यासह आदी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते हा पुरस्कार शहराच्या प्रथम नागरिक तथा  नगराध्यक्षा सौ. मंगलताई मुंडे यांनी वडवणी नगर पंचायतच्या वतीने स्विकारला. हा पुरस्कार सोहळा अहमदनगर येथिल यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यास राज्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, प्रशासकीय अधिकारी, नामांकित कंपनीचे संचालक, पञकार बांधव सह आदी मान्यवर व राज्यातील सत्कारमुर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडवणी नगर पंचायतच्या वतीने हा पुरस्कार स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा सौ. मंगलताई मुंडे यांसह उपनगराध्यक्षा सौ. वर्षाताई वारे, जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ मुंडे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, लेखाधिकारी अयुब पठाण,  सभापती प्रेमदास राठोड, नगरसेवक राजाभाऊ पवार, भानुदासराव उजगरे, किसनराव राठोड, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष महादेवराव जमाले, अंकुशराव वारे यासह आदी उपस्थित होते.
दरम्यान या पुरस्कारामुळे वडवणी नगर पंचायतचे कार्य राज्य पातळीवर पोहचले असुन यामुळे शहराचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले आहे. याबध्दल नगर पंचायतचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment