Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

शासन आणि जनतेतील दुवा म्हणजे ग्रामीण वार्ताहर : मुकुंद चिलवंत

प्रतिनिधी । शिऊर

शासन अनेक कल्याणकारी योजना राबवते,  ह्या योजना  आणि उपक्रम लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचे महत्वपूर्ण काम वार्ताहाराने करणे गरजेचे असून ग्रामीण वार्ताहाराने नेहमी सकारात्मक लिखाणावर भर द्यावा. अशा सकारात्मक लिखाणामुळे समाजातील अनेक जण प्रेरित होऊन निश्चितच बदल घडवून आणतील असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी व्यक्त केला.

वैजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाची दि १५ रोजी शिऊर बंगला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हा माहिती अधिकारी
मुकुंद चिलवंत बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष संजय पगारे होते. चिलवंत म्हणाले की, माहिती कार्यालय आणि पत्रकारांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. शासनाच्या योजनांना गावकुसा पर्यंत पोहचवण्याचे माध्यम म्हणजे ग्रामीण वार्ताहर आहे. दैनिकाचा पायाभूत श्रोत आहे तसेच समाजातील महत्वाचा घटक हा ग्रामीण वार्ताहर असल्याने माध्यमाच्या बदलत्या प्रवाहाची माहिती वार्ताहरांना होणे गरजेचे आहे यासाठी वैजापूर ग्रामीण पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण वार्ताहरांसाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करणार असून पत्रकारिता आणि माहिती संचानलयाशी निगडित तज्ज्ञांच्या मार्गदर्शखाली दोन सत्रात कार्यशाळा घेण्याचा मानस चिलवंत यांनी बोलून दखवला. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन औरंगाबाद जिल्हा आणि लोकराज्य पुस्तिकेचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.

वैजापूर तालुक्यातील कर्तबगारांचा पत्रकार संघ गौरव करणार

वैजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दि ६ जानेवारी २०१८ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे या पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनाबाबत देखील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख सौरभ लाखे यांनी केले, या बैठकीस कार्याध्यक्ष सुचरण छानवाल, सचिव रमेश राऊत, उपाध्यक्ष रामेश्वर श्रीखंडे, विजय मोगल, राधाकृष्ण सोनवणे, शांताराम मगर, सौरभ लाखे, हर्ष कासलीवाल, सुधीर बागुल, अर्जुन तेलंगे, गणेश सावंत, सागर देवकर, दादासाहेब तुपे, राजेंद्र जानराव, सय्यद तैमूर, भगीरथ कदम, डॉ.सचिन कुमावत, प्रा.आबासाहेब कसबे, प्रदीप जाधव, अझहर खान, चंद्रकांत हारदे, प्रमोद गुळे, राजेश धनाड, विजय त्रिभुवन, अरविंद पवार, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.

फोटो:

No comments:

Post a Comment