तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

  रेणुकादेवी संस्थान माहूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०१७ ची युद्धपातळीवर तयारी

विश्वस्त सामिर भोपी यांची माहिती.
---------------------------
  जितू चोले
  माहूर/ प्रतिनिधी 

शारदीय नवरात्र महोत्सव २०१७ निमित्य माहूर गडावर उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरु झाली असून मंदिर रंगरंगोटी, विद्युत व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करणे या कामाला महत्व देण्यात आले असून भाविक सुरक्षेच्या मुद्य्यावर या नवरात्रात विश्वस्त समितीचे विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना संस्थानचे विश्वस्त समीर भोपी यांनी दिली.

                 शारदीय नवरात्र महोत्सव २०१७ च्या तयारी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रस्तुत प्रतिनिधी श्री रेणुकादेवी संस्थान येथे गेले असता ते बोलत होते. पुढे बोलतांना संस्थानच्या आरोग्य विभागात एक वैद्यकीय अधिकारी व एक नर्स असे दोन कर्मचारी असून एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध आहे. तालुका प्रशासन व आरोग्य विभागा मार्फत आवश्यकते नुसार कर्मचारी व रुग्णवाहिका  तैनात करण्यात येणार असून भाविकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्या जाणार आहे. संस्थानाच्या सुरक्षा विभागात एक मुख्य सुरक्षा अधिकारी व ३५ नियमित सुरक्षा रक्षक व ३५ कंत्राटी रोजंदारी कर्मचारी उत्सव काळात  सुरक्षा विभागात नियुक्त करण्यात येणार आहेत शिवाय उत्सवाकाळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

                  पोलीस प्रशासनातर्फे आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी फिल्टर व थंड पाण्याची पुरेस्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक  त्या ठिकाणी वाटर फिल्टर ठेवण्यात येणार आहेत. गडावरील स्वच्छतेसाठी  ११ नियमित कर्मचारी असून उत्सव काळासाठी तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेनुसार सफाई कर्मचारी नेमण्यात येणार  आहेत. अग्निशामक दलास उत्सव काळात पाचारण करण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्था अखंडितपणे सुरु राहावी यासाठी उपाययोजना म्हणून जास्त क्षमतेचे नवीन जनरेटर खरेदी करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा प्रशासन व तालुका तर्फे यात्रा नियोजनाच्या दृष्टीने प्राप्त सर्व सूचना व आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून भाविकांना  यात्रा सुखकर करण्यासाठी साठी विश्वस्त समिती सज्ज झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

                 उत्सव काळात नियीमित वेळेत बदल करून श्री रेणुकामाता मंदिर सकाळी ५:०० ते  सायंकाळी १०:०० वाजे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले  ठेवण्यात येणार आहे. दि. २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात पारंपारिक पुजा अर्चा व सर्व धार्मिक कार्ये करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान प्रतिवर्षी प्रमाणे ललित पंचमी निमित दि. २४ रोजी प्रख्यात गायक पं.श्रीधर फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

                 अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी नांदेड, नरेंद्र देशमुख,  संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा उपविभागीय अधिकारी किनवट ,आसाराम जहारवाल, संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष  तथा उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, सिद्धेश्वर वरणगावकर संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष तथा तहसीलदार माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी  करत असून शारदीय नवरात्र उत्सवात संस्थानच्या वतीने दि.२१ ते ३० सप्टेंबर पर्यंत  भाविकां करिता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशीही माहिती विश्वस्त समीर भोपी यांनी दिली. यावेळी विश्वत संजय काण्णव, चंद्रकांत भोपी, शुभम भोपी, अश्विन भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे, मुख्य सुरक्षा अधिकारी सुभेदार प्रकाश सरोदे  यांची उपस्थिती होती.

     

No comments:

Post a Comment