तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

सेनगांव तहसिलवर काँग्रेसचा भव्य माेर्चा धडकला

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन हाेऊन तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला.परंतु या शासनाच्या काळात कुठलेही शेतकरी न्यायीक कामे न झाल्याने एकाधिकारशाहीच्या विराेधात आज काँग्रेसच्या वतीने तहसिल कार्यालयाला समाेर खा.राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली आज दि.११ सप्टेंबर साेमवार राेजी भव्य माेर्चा धडकला.
केंद्रात भाजपाचे सरकार असुन त्याच्या तीन वर्षीय कार्यकाळात शेतकरी आत्महत्या राेखण्यास अपयशी ठरले आहे. या शासनाच्या काळात नाेटाबंदी दरम्यान शेतक-यांसह सर्वसामान्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.शेतक-यांची गैरसाेय व एकाधिकारशाही माेडीत काढण्यासाठी आज दि.११ सप्टेंबर साेमवार राेजी काँग्रेस च्या वतीने खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत सेनगांव शहरातील संत सातारकर महाराज मंदिरापासुन या भव्य माेर्चाला सुरुवात झाली. हा माेर्चा बसस्थानक, शिवाजी चाैकातुन तहसिलवर धडकला. हा माेर्चा तहसिल वर आल्यावर तहसिल समाेरच धरणे आदाेंलन करुन खा.राजीव सातव,काँग्रेसचे हिंगाेली जिल्हाध्यक्ष संजय बाेंढारे,विनायकराव देशमुख यांच्यासह आदी नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारवर हल्लाबाेल केला. तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर नमुद करण्यात आले आहे की, शेतक-यांचा सातबारा काेरा झालाच पाहीजे,शेतक-यांच्या मुलांना उच्च शिक्षण माेफत मिळालेच पाहीजे,विजपुरवठा २४ तास मिळाला पाहीजे,शाैचालयाचे अनुदान सरसकट मिळालेच पाहीजे,स्वामिनाथन आयाेगाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, निराधारांना दरमहा १५०० रुपये अनुदान देण्यात यावे या मागण्यासह इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी खा.राजीव सातव,कळमनुरीचे आ.संताेष टारफे,जिल्हाध्यक्ष संजय बाेंढारे, माजी जि.प.अध्यक्षा सराेजनी खाडे,विनायकराव देशमुख,विलास खाडे,डाँ.रवि पाटील,नगरसेवक अजय विटकरे,सतिश खाडे,अमरदिप कदम,प्रकाश वाघ,दिलीप हाेडबे,विठ्ठलराव शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक उपस्थित हाेते.

No comments:

Post a Comment