Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

गावठी हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

 

परभणी  : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक परभणी/हिंगोली (परभणी) या कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने परभणी जिल्हयात ड्राय डे घोषित केल्यामुळे, पाथरी तालुक्यातील मसला शिवार, मसला तांडा शिवार व कानसुर शिवार ता.पाथरी जि.परभणी येथे गोदावरी नदीकाठी या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु निर्मिती केली जात आहे, अशी गुप्त खबर मिळाल्यावरुन सदर ठिकाणी छापा घालून निर्मिती केंद्रे नष्ट केली.

            सदर छाप्यामध्ये एकुण 1290 ली. गुळपाणी मिश्रीत कच्चे उग्र वासाचे रसायन प्रत्येकी 200 लिटर क्षमतेचे 06 लोखंडी ड्रम व 02 प्लास्टीक ड्रम, 06 पत्र्याचे डबे, 04 प्लास्टीक कॅन, एक जर्मनची थाळी, एक जर्मन पातेले असे गावठी हातभटी दारु निर्मिती करण्यास लागणारे साहित्य मिळून आले. त्यांची अंदाजे किंमत रु.34800/- आहे.

            सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री पवार व अधीक्षक परभणी श्री पटारे यांचे निर्देशानुसार निरीक्षक श्री सत्यवान गवस, सर्वश्री जवान राहुल बोईनवाड, सागर मोगले, भीमेश्वर पुपलवाड, यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा पुढील तपास श्री गवस निरीक्षक हे करंत आहेत.

            या पुढेही अवैध मद्य विक्री, वाहतुक, बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी दारु निर्मिती, पर राज्यातील अवैध मद्य यावर अशीच मोठया प्रमाणात कारवाई केली जाईल. 

No comments:

Post a Comment