तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

अहिल्यायुवा प्रतिष्ठाणच्या पत्रकारिता पुरस्काराने विनोद नरसाळे सन्मानित

सुभाष मुळे....
--------------------
गेवराई, दि. 7 __ अहिल्या युवा प्रतिष्ठानचा उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार यावर्षी तालुक्यातील कोळगाव येथील रहिवाशी व दैनिक पुढारीचे गेवराई तालुका प्रतिनिधी विनोद नरसाळे यांना मिळाला असुन रविवारी उमापुर येथे करिअर मार्गदर्शन, बालक-पालक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करुन सन्मान चिन्हासह गौरविण्यात आले.
            अहिल्या युवा प्रतिष्ठानचे संस्थापक इंजिनियर कृष्णाजी वीर यांच्या संकल्पनेतुन व जय मल्हार गणेश मंडळातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. रविवारी दि. 3 सप्टेंबर रोजी उमापुर येथे करिअर मार्गदर्शन, बालक-पालक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, माजी जि.प.सदस्य रावसाहेब देशमुख, तंटामुक्तीअध्यक्ष अप्पासाहेब औटी, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकूश निर्मळ, प्रसिद्धी व्याख्याते धर्मराज करपे, धनगर कर्मचारी महासंघाचे चंद्रकांत भोंडवे, अॅड. तात्यासाहेब मेघार, भागवत राऊत सर,  सुभाष काळे सर, रावसाहेब काळे, लक्ष्मण आहेर, अजहर इनामदार उपस्थित होते. यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार भगवान फूंदे, समाजभूषण पुरस्कार मल्हार सेना जिल्हा प्रमुख अमर ढोने, उत्कृष्ट केंद्र प्रमुख ए.टी.चव्हाण, उत्कृष्ट सहाय्यता अनील ढोले, यांच्यासह उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार म्हणून पत्रकार विनोद नरसाळे यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
        विनोद नरसाळे यांनी पत्रकारीता करत असताना धोंडराई येथील ऊसतोड मजुराची मुलगी पल्लवी कदमची संघर्ष कहाणी, उमापुर येथील मसनजोगी कुटुंबातील मुले शिक्षणापासुन वंचित, कासारवाडी येथील शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षिकांनी उभारली रोपवाटीका, पाडळसिंगी जवळील ब्रम्हगाव येथील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेले पारधी समाजाची कुटुंब व त्या कुटुंबातील मुले शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलासंदर्भात 'शाळा म्हंजे काय रं भौ' यासह समाजातील वंचित घटकांना न्याय व नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्याची दखल घेत अहिल्या युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर कृष्णाजी वीर यांनी दखल घेत उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देऊन सन्मानित केले. विनोद नरसाळे यांना मिळालेल्या पोलिस मित्र पुरस्कारामुळे प्रत्यक्ष, फोन, सोशल मिडीयाद्वारे त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment