तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

अंबड येथील गगराणी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करा


आशिष धुमाळ

 परतूर बंद : मुक मोर्चा काढुन  मागणीचे दिले निवेदन
परतूर – अंबड येथील तरुण गोविंद शिवप्रसाद गगराणी यांच्या अमानुष हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी शहरातील राजस्थानी समाजाच्या वतीने करण्यात आली. या बंदला मोर्चाला विविध पक्ष ,संघटना यांचा पाठींबा लाभला,  दरम्यान,गुरुवारी शहरात बंद पाळण्यात आला.त्यानंतर मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

     यासंदर्भात व्यापा-यांच्या वतीने उपविभागीय अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अंबड येथील व्यापारी शिवप्रसाद गगराणी यांचे पुत्र गोविंद गगराणी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली.पोलीस तपासात असे निष्पन झाले आहे की,हे कृत्य खंडणीसाठी करण्यात आले आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापा-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.अपराधी प्रवृत्तीचे मनोबल वाढल्यामुळे अशा घटनांचे प्रमाण वाढते व सभ्य स्दामाज यामुळे प्रभावित होतो.अशा परिस्थितीत योग्य संरक्षण मिळावे व असामाजिक तत्वांवर वचक असावा ही प्रशानाकडून अपेक्षा आहे.

 दरम्यान,या हत्याकांडाचा व्यापा-यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन अशा घटना भविष्यात घडणार नाहीत.दिलेल्या निवेदनावर दिनेश बगडिया,राधेश्याम मुंदडा,राजेश मंत्री,मुकेश गुप्ता,निहित कसलेचा,सौरभ बगडिया इतरांच्या सह्या आहेत.दरम्यान,घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापा-यांनी बंद पाळला.बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment